ऑनलाईन स्ट्रिमिंग क्षेत्रातील सर्वाधिक लोकप्रिय अ‍ॅप म्हणून ‘नेटफ्लिक्स’ कडे पाहिलं जातं. ऑनलाइन वेबसीरिज, चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांसाठी पहिली पसंती नेटफ्लिक्सला असते. नुकताच ‘घोस्ट स्टोरीज’ नावाचा कलात्मक भूतपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे. यामध्ये बऱ्याच जणांना हा चित्रपट फारसा रुचलेला नसल्याचं दिसून येत आहे.

दिग्दर्शिका जोया अख्तर, दिबाकर बॅनर्जी, करण जोहर आणि अनुराग कश्यप यांनी चार भागांमध्ये हा चित्रपट तयार केला आहे. मात्र यातील करण जोहर याने दिग्दर्शित केलेला भाग नेटकऱ्यांना आवडला नसल्याचं दिसून येत आहे.

या चित्रपटातील पहिला भाग पाहिल्यानंतर एका नेटकऱ्याने “रहेने दे बेटा तुमसे नहीं हो पायेगा”, असं म्हटलं आहे. तर काहींच्या मते, चित्रपटाचं नाव ‘घोस्ट स्टोरीज’ दिलं असून त्यात भीतीदायक काहीच वाटत नसल्याचं म्हटलं आहे.

दिग्दर्शक करण जोहरने दिग्दर्शित केलेल्या भागावरही नेटकऱ्यांनी टीका केली आहे.


दरम्यान, नेटफ्लिक्सवर आतापर्यंत ‘सेक्रेड गेम्स’, ‘दिल्ली क्राईम’, ‘लिटिल थिंग्स’ अशा बऱ्याच सीरिज लोकप्रिय ठरल्या आहेत. तसेच काही चित्रपटही हिट ठरले आहेत. मात्र हा चित्रपट काही प्रेक्षकांच्या पसंतीत उतरलेला नाही.