05 August 2020

News Flash

दिल्लीकरांनी प्रत्येक भारतीयाच्या मनातील संदेश दिला – अवधूत गुप्ते

अवधूतने भाजपाला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

अरविंद केजरीवाल, अवधूत गुप्ते

ऐतिहासिक निकाल देऊन दिल्लीकरांनी जणू प्रत्येक भारतीयाच्या मनातील संदेश दिला आहे, असं ट्विट गायक-संगीतकार अवधूत गुप्तेनं केलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून अवधूतने भाजपाला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. दिल्लीकर मतदारांनी आम आदमी पक्षाच्या (आप) विकासाच्या धोरणाला एकतर्फी कौल दिला. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांपैकी ‘आप’ने ६२ जागांवर विजय मिळवला.

या निकालानंतर ट्विट करत अवधूत म्हणाला, “असा ऐतिहासिक निकाल देऊन दिल्लीकरांनी जणू प्रत्येक भारतीयाच्या मनातील संदेश दिलाय की आम्हाला शाळा, रस्ते आणि महिलांची सुरक्षा हवीये. मंदिरं, मशिदी, पुतळे, कलमं आणि त्यावरुन कुठलाही वाद नकोय! अभिनंदन दिल्लीकर!”

पाच वर्षांनंतर पुन्हा ‘आप’ने अटकेपार झेंडा फडकावल्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासाठी हा विजय ऐतिहासिक मानला जातो. तर निवडणुकीत ५५ जागा मिळण्याचा विश्वास व्यक्त करणाऱ्या भाजपाला केवळ आठच जागा जिंकता आल्या. काँग्रेसला पुन्हा खातेही उघडता आले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2020 11:47 am

Web Title: avdhoot gupte tweet on delhi election results ssv 92
Next Stories
1 ‘अग्निहोत्र 2’मध्ये मोहन जोशींची होणार एन्ट्री
2 सारा अली खानला आहे ‘हा’ आजार; मुलाखतीत केला खुलासा
3 ‘मला हेच करायचे आहे’; कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना नुसरतचं बेधडक उत्तर
Just Now!
X