22 February 2020

News Flash

जबरा फॅन! आयुषमानसाठी चाहत्याने नेसली साडी

पार्टीमध्ये या चाहत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते

‘अंधाधून’ चित्रपटातील भूमिकेसाठी आयुषमान खुरानाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा आनंद साजरा करण्यासाठी आयुषमानने त्याच्या घरी एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये चित्रपटाच्या टीमसह बॉलिवूडमधील इतर अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. दरम्यान पार्टीमध्ये एका व्यक्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. परंतु ही व्यक्ती अगंतुकासारखी पार्टीमध्ये घुसली होती.

आयुषमान खुरानाने आयोजित केलेल्या पार्टीमध्ये एक चाहता जबरदस्ती पार्टीमध्ये घुसला होता आणि आयुषमानला शोधू लागला. दरम्यान त्या चाहत्याने आयुषमानचा ‘ड्रीम गर्ल’ लूक फॉलो केला होता. आयुषमानने चित्रपटात टी-शर्टवर साडी नेसली आहे आणि या चाहत्याने देखील अशीच साडी नेसली होती. चाहता आयुषमान जवळ पोहोचताच आयुषमानने त्याला हकलण्याऐवजी त्याच्यासोबत सेल्फी काढला. त्यांचा हा फोटो सध्या इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे.

आयुषमानचा ‘ड्रीम गर्ल’ हा चित्रपट १३ डिसेंबरला प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटात आयुषमानसह ‘सोनू के टिटू की स्विटी’मधील अभिनेत्री नुसरत भरूचा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती एकता कपूर आणि शोभा कपूर यांनी केली असून चित्रपटाचे दिग्दर्शन राज शांडिल्य करत आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर पाहाता आयुषमान चित्रपटात महिलांच्या भूमिका साकारताना आणि महिलेच्या आवाजात बोलताना दिसत आहे.

First Published on August 23, 2019 5:21 pm

Web Title: ayushman khurana fan wore saree and come to party avb 95
Next Stories
1 सिंधू होणार रानडेंची सून, घरात सुरु झाली लगीनघाई
2 ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांची विटंबना करणं निंदनीय’ – सुबोध भावे
3 ‘दोन घडींचा डाव’, राखी सावंतचा संसार मोडला?