19 October 2019

News Flash

‘बाहुबली’ प्रभास इन्स्टाग्रामवर! डीपी नाही, पोस्ट नाही तरीही फॉलोअर्स सात लाखांवर

गेल्या काही दिवसांपासून प्रभास इन्स्टाग्रामवर पदार्पण करण्याची चर्चा होती.

प्रभास

‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभासच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. कारण प्रभासने नुकतंच इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंग अॅपवर पदार्पण केलं आहे. प्रभासने इन्स्टाग्रामवर अकाऊंट सुरू केलं असून अद्याप त्याने कोणतंच पोस्ट टाकलं नाही. तरीसुद्धा त्याच्या फॉलोअर्सची संख्या सात लाखांवर गेली आहे.

actorprabhas असं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटचं नाव असून त्याने कोणताच डीपीसुद्धा ठेवलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून प्रभास इन्स्टाग्रामवर पदार्पण करण्याची चर्चा होती. आपल्या आवडच्या सेलिब्रिटीच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यास चाहते नेहमीच उत्सुक असतात. सोशल मीडियामुळे चाहते आणि सेलिब्रिटींमधील दरी कमी होते. हेच जाणून घेत प्रभासने इन्स्टाग्रामवर येण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रभासचा आगामी ‘साहो’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री श्रद्धा कपूरचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ‘साहो’मधील साहसदृश्यांसाठी हॉलिवूडमधील ५० लोकांची एक टीम भारतात बोलावण्यात आली आहे. ही टीम प्रभासला अ‍ॅक्शन सीनसाठी प्रशिक्षित करणार आहे. या प्रशिक्षणात सहभागी असलेल्या ५० लोकांनी अनेक हॉलिवूड चित्रपटांसाठी काम केले आहे.

‘साहो’मध्ये प्रभास आणि श्रद्धासोबतच नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर आणि चंकी पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट हिंदी, तेलुगू आणि तमिळ या भाषांमध्ये शूट केला गेला आहे.

First Published on April 15, 2019 6:53 pm

Web Title: baahubali fame prabhas made instagram debut ahead release of saaho and followers reached upon 7 lakhs