योगगुरु रामदेवबाबा हे हत्तीवर योगासनं करत होते. त्यानंतर काही वेळातच ते हत्तीवरुन खाली पडले. यासंदर्भातला त्यांचा व्हिडीओ ट्विटरवर चांगलाच व्हायरल होतो आहे. रामदेवबाबा खाली पडले पण त्यांना कोणतीही इजा झाली नाही. दरम्यान त्यांच्या या लक्ष वेधून घेणाऱ्या व्हिडीओवर अभिनेत्री फराह खान अली हिने प्रतिक्रिया दिली. “पाठीच्या कण्याला होणारी दुखापत फार गंभीर असते. मला आशा आहे की ते लवकर बरे होतील.” अशा आशयाचं ट्विट करुन तिने रामदेवबाबांसाठी चिंता व्यक्त केली आहे.

सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी मोदींना पाठवा हा मेसेज; सुशांतच्या बहिणीचं आवाहन

“तुमच्याकडे फाटलेले कपडे असतील तर सारा अली खानला द्या”, अभिनेत्याचं अजब आवाहन

हत्तीवर बसून बाबा रामदेव योगासनातले एक आसन शिकवत होते. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ साधारण २२ सेकंदांचा आहे. ज्यामध्ये हत्तीवर बसून बाबा रामदेव योगासनं करत आहेत. मात्र अचानक हत्ती हलला. त्यामुळे रामदेव बाबांचा तोल गेला आणि ते खाली पडले. मात्र या घटनेत त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. ते पडल्यानंतर काही लोक हसले त्याचा आवाजही व्हिडीओत येतो आहे. दरम्यान या कार्यक्रमात बाबा रामदेव यांनी योगासनांमुळे काय काय फायदे होतात? याची माहिती दिली. तसंच अनुलोम व विलोम आणि इतर योगांविषयीही माहिती दिली. योग केल्याने कठीणातले कठीण आजार नाहीसे होतात. लोकांनी रोज सकाळी किंवा संध्याकाळी योगासनं करायला हवीत असंही वक्तव्य त्यांनी केलं.