News Flash

बाल्की यांच्या चित्रपटात बच्चन दाम्पत्य अतिथी

बॉलीवूडमध्ये पडद्यावरच्या जोडय़ा प्रत्यक्ष जीवनातही जमतात आणि त्यानंतर जोडीपैकी कोणीतरी एक काही काळ किंवा अल्प काळ रुपेरी पडद्यावरून निवृत्ती पत्करतो.

| August 19, 2015 03:47 am

बॉलीवूडमध्ये पडद्यावरच्या जोडय़ा प्रत्यक्ष जीवनातही जमतात आणि त्यानंतर जोडीपैकी कोणीतरी एक काही काळ किंवा अल्प काळ रुपेरी पडद्यावरून निवृत्ती पत्करतो. तुलनेत त्यांचे एकत्र काम केलेले चित्रपट त्यांच्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांनाही कमी पाहायला मिळतात. बॉलीवूडची अशीच एक लोकप्रिय जोडी दीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर लवकरच पाहायला मिळणार आहे.बॉलीवूडचे शहेनशहा ‘बिग बी’ अर्थात अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी जया भादुरी-बच्चन हे दोघेही दीर्घ कालावधीनंतर बॉलीवूडच्या एका चित्रपटात एकत्र काम करत आहेत. निर्माता आर. बाल्की यांच्या ‘की अॅँण्ड का’ या चित्रपटात हे दोघे जण एकत्र पाहायला मिळणार आहेत. या दोघांची जोडी १४ वर्षांनंतर बॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे.
काही वर्षांपूर्वी करण जोहरच्या ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटात प्रेक्षकांना ते पाहायला मिळाले होते. ‘शोले’, ‘मिली’, ‘अभिमान’, ‘एक नजर’, ‘चुपके चुपके’ आणि अन्य काही चित्रपटातून अमिताभ व जया यांची जोडी पाहायला मिळाली होती. प्रेक्षकांनीही या जोडीला स्वीकारले होते. आगामी ‘की अॅण्ड का’ चित्रपटाच्या काही भागांचे चित्रीकरण नुकतेच अमिताभ यांच्या निवासस्थानी व एका हॉटेलमध्ये पार पडले. चित्रीकरणात ते दोघेही सहभागी झाले होते.
आपण आणि जया दीर्घ कालावधीनंतर या चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र काम करत असल्याची माहिती दस्तुरखुद्द अमिताभनेच आपल्या ‘ट्विटर’ खात्यावरून जाहीर केली आहे.‘मी पुन्हा एकदा माझी पत्नी जया आणि आर. बाल्की सोबत ‘की अॅण्ड का’ या चित्रपटात काम करत आहे. चित्रपटात करिना कपूर व अर्जुन कपूर हे कलाकारही आहेत. चित्रपटात आम्ही दोघेही ‘पाहुणे कलाकार’ आहोत,’ असे ‘ट्विट’ अमिताभ यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2015 3:47 am

Web Title: bachhan couple guest appearance of balkis movie
Next Stories
1 पाहा अक्षयच्या ‘सिंग इज ब्लिंग’चा ट्रेलर
2 माझ्या यशाचे श्रेय मी नशिबाला देत नाही – नावाझुद्दीन सिद्दिकी
3 ‘चला हवा येऊ द्या’च्या आजच्या भागात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारांचा जागर
Just Now!
X