‘इंडियन आयडल’ या शोच्या मंचावर कायमच वेगवेगळे पाहूणे हजेरी लावत असतात. आजवर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी या मंचावर हजेरी लावत या सुरेल मैफिलीचा आनंद लुटला आहे. मात्र ‘इंडियन आयडल’च्या एपिसोडमध्ये यावेळी एका खास पाहुण्याने हजेरी लावली होती. सोशल मीडियावर धुमाकुळ घालणाऱ्या ‘बचपन का प्यार’ फेम सहदेव दिर्दोने या खास एपिसोडमध्ये हजेरी लावली.
याव खास एपिसोडमध्ये ‘बचपन का प्यार’ चा फिव्हर पाहायला मिळाला. जजेसह सर्वच स्पर्धकांनी ‘बचपन का प्यार’ गाण्यावर सहदेवसोबत धमाल केली. ‘इंडियन आयडल’ चा होस्ट आदित्य नारायणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या धमाल एपिसोडमधील एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत अनु मलिकसह आदित्य, सोनू कक्कर तसचं अरुनिता, निहाल आणि सायली हे स्पर्धकही सहदेवसोबत ‘बचपन का प्यार’वर ठेका धरताना दिसत आहेत.
View this post on Instagram
या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये आदित्य म्हणाला, “बचपन का प्यार क्यूट सहदेव आणि इंडियन आयडलच्या टीम सोबत”
गेल्या काही दिवसात बॉलिवूडसह अनेकांना ‘बचपन का प्यार’ ने भुरळ घातली आहे. अनेक जण या गाण्यावरील आपले रील्स सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत. या गाण्यामुळे सहदेवला अगदी कमी काळातच मोठी पसंती मिळाली आहे. लवकरच सहदेव रॅपर बादशहासोबत एका गाण्यात झळकणार आहे.