News Flash

या फोटोमध्ये नीना गुप्ता यांना ओळखलंत का?

त्यांना ओळखणंही कठीण आहे

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता कायम त्यांच्या सुपरहिट चित्रपटांसाठी आणि फॅशनसेन्ससाठी चर्चेत असतात. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असलेल्या नीना गुप्ता अनेक वेळा इन्स्टाग्रामवर त्यांचे फोटो शेअर करत असतात. त्यातच त्यांनी ‘डॅडी’ या चित्रपटातील एक जुना फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे या फोटोमध्ये त्या प्रचंड वेगळ्या दिसत असून त्यांना ओळखणंही कठीण आहे.

१९८९ साली प्रदर्शित झालेला ‘डॅडी’ हा चित्रपट त्याकाळी प्रचंड गाजला होता. या चित्रपटामध्ये पूजा भट, अनुपम खेर, सोनी राजदान, नीना गुप्ता,सुहास जोशी, सतीश कौशिक हे कलाकार झळकले होते. या चित्रपटाला ३० वर्ष पूर्ण झाली असून नीना गुप्ता यांनी या चित्रपटाच्या संपूर्ण टीमचा एक जुना फोटो शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

Yaadein. Film daddy

A post shared by Neena Gupta (@neena_gupta) on

वाचा : Photo : शेवंताच्या लहानपणीचे क्यूट फोटो पाहिलेत का ?

दरम्यान, त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये प्रत्येक कलाकार वेगळ्या रुपात दिसत असून नीना गुप्ता या प्रचंड वेगळ्या दिसत आहेत. विशेष म्हणजे त्यांना ओळखणंही कठीण असल्याचं समजून येतं. हा फोटो शेअर करत नीना यांनी ‘यादे’ असं कॅप्शन त्याला दिलं आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2019 10:54 am

Web Title: badhaai ho actress neena gupta share her throwback photo ssj 93
Next Stories
1 Photo : शेवंताच्या लहानपणीचे क्यूट फोटो पाहिलेत का ?
2 अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यातली ‘जेबी’ आहे तरी कोण?
3 ”नेहाला स्पर्धकाने किस केलं तेव्हा परीक्षक शांत का?”; नेटकऱ्यांच्या प्रश्नावर विशालचं उत्तर
Just Now!
X