सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांची नात जनाईचा अभिनेता रणवीर सिंग बरोबरचा सेल्फी सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. जनाई तिच्या आजीप्रमाणेच गायिका आहे. तिने नुकतेच ‘सिक्स पॅक’ या तृतीयपंथीयांच्या बँडसोबत एका गाण्याचे चित्रीकरण केले. याचवेळी तिची गाठ रणवीर सिंगशी पडली आणि या दोघांनी सेल्फी काढला.

आशा भोसले यांनी हा सेल्फी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला. यानंतर रणवीरने आशा भोसले यांच्या ट्विटला उत्तर देताना आशाजींचे आभार मानले, तसेच जनाईचे कौतूकही केले. जनाई ही तिच्या आजीसारखीच प्रेमळ, प्रतिभावान आणि सुंदर आहे, असे रणवीरने आपल्या संदेशात म्हटले आहे.