News Flash

रणवीरच्या या अतरंगी वेशभूषेने सोशल मीडियावर सतरंगी चर्चांना उधाण!

शाहिद कपूरच्या प्री बर्थडे बॅशला रणवीरने हजेरी लावली होती

छाया सौजन्य- ट्विटर

अभिनेता रणवीर सिंग नेहमीच त्याच्या दिलखुलास अंदाजासाठी ओळखला जातो. पण, रणवीरचा हा अंदाज कधीकधी त्याला नको त्या चर्चांच्या वर्तुळातही प्रकाशझोतात आणतो असे म्हणणे वावगे ठरणार नाही. अभिनेता शाहिद कपूरच्या प्री बर्थडे पार्टीमध्ये रणवीरचा हा वेगळाच अवतार पाहायला मिळाला. या पार्टीमध्ये विविध बी टाऊन सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. पण, या सर्व कलारांमध्ये लक्ष वेधले ते म्हणजे अभिनेता रणवीर सिंगच्या वेशभूषेने. सफेद रंगाच्या एका वेगळ्या प्रकारच्या ड्रेसमध्ये रणवीर या पार्टीला आला होता.

एखाद्या आवरणाप्रमाणे किंवा रेनकोटप्रमाणे दिसणाऱ्या त्याच्या या ड्रेसवर अनेकांच्याच नजरा रोखल्या होत्या. सोशल मीडियावर रणवीरच्या या वेशभूषेवर मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली असून त्याच्या या वेशभूषेची तुलना कंडोमशी करण्यात आली आहे. अनेकजणांनी त्याची खिल्लीही उडवली आहे. शुक्राणू, कंडोम, हिजाब, एलियन, श्रद्धांजली देण्यासाठीचा ड्रेस अशा विविध विषयांशी तुलना करत रणवीरवर नेटिझन्सकडून निशाणा साधण्यात आला आहे. अभिनेता रणवीर सिंग नेहमीच त्याच्या वेशभूषेत विविध प्रयोग करत असतो. पण, कधीकधी हेच प्रयोग वेगळ्याच मार्गाने त्याच्या अंगलगट येतात. तेव्हा आता सर्वच गोष्टी खेळीमेळीच्या दृष्टीने पाहणारा हा बेफिक्रा अभिनेता सोशल मीडियावर होणाऱ्या या चर्चांना काही उत्तर देणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दरम्यान, बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी कालचा रविवार हा पार्टीमय होता. जुहू येथे आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत बॉलिवूडमधील सर्व प्रसिद्ध मंडळी पाहावयास मिळाली. बॉलिवूडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूर याच्या वाढदिवसाच्या आधीच एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. खरंतर शाहिदचा वाढदिवस २५ फेब्रुवारीला असतो. पण, त्याची पत्नी मीरा राजपूत हिने त्याच्या वाढदिवसाची पार्टी आधीच दिली. येत्या २५ फेब्रुवारीला शाहिद कपूर ३६ वर्षांचा होणार आहे. सध्या शाहिद ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटामध्ये त्याच्यासह अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्याही मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2017 6:42 pm

Web Title: befikre ranveer singhs latest ridiculous outfit is going viral on social media
Next Stories
1 स्पृहाला मिळालेलं ‘ग्रेटेस्ट गिफ्ट’
2 करिना म्हणते सैफ, शाहिद सर्वोत्तम
3 ‘तू सूरज मै सांझ पिया जी’; लवकरच येतोय ‘दिया और बाती हम’चा सिक्वल
Just Now!
X