सलमान खान आणि त्याची प्रेयसी लुलिया वंतूर यांच्या प्रेमसंबंधांबद्दल आतापर्यंत अनेक चर्चा सिनेसृष्टीत झाल्या आहेत. दोघंही लवकरच लग्न करतील अशाही बातम्या आल्या आहेत. व्हॅलेन्टाइन डे च्या पूर्वी लुलियाने सलमान खानवरील प्रेम पुन्हा दाखवून दिले आहे. सलमानने दिले. लुलियाने इन्ट्राग्रामवर सलमानने गिफ्ट दिलेल्या लॉकेटचा फोटो शेअर करुन दोघांमध्ये कोणताही दुरावा नसल्याची भावना व्यक्त केल्याचे दिसते. लुलियाने शेअर केलेल्या या फोटोनंतर सलमानला प्रेसयी लुलिया काही खास भेट देणार का? असा प्रश्न सलमान खानच्या चाहत्यांना नक्कीच पडू शकतो. व्हॅलेन्टाइन डे च्या निमित्ताने लुलियाने दिलेला प्रेमाचा सिग्नल लग्नामध्ये कधी बदलणार हा बॉलिवूडसह सर्वासाठी उत्सुकतेचा विषय आहे. सलमानच्या लग्नाच्या चर्चा चांगलीच रंगत असते. अक्षय कुमारच्या ‘जॉली एलएलबी २’ या चित्रपटामध्ये देखील याचे उदाहरण पाहायला मिळाले होते. अक्कीने चित्रपटातील कोर्टात सलमानच्या लग्नावर विचारलेला प्रश्न प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात राहिला होता. त्यामुळेच सलमान लग्न कधी करणार ? असा प्रश्न अक्षय कुमारला प्रमोशनवेळी त्याला विचारण्यात आल्याचे पाहायला मिळाले होते.

सलमान खान आणि त्याची तथाकथित प्रेयसी लुलिया वंतुर हे अद्यापही त्यांच्या नात्याबाबत सर्वांसमोर काहीच बोलले नाहीत. सलमान हा कबीर खानच्या आगामी ‘ट्युबलाइट’ चित्रपटासाठी लडाखला गेला होता. दरम्यान, त्याने लुलियाच्या आई-वडिलांनाही लडाखमध्ये फिरवले होते. चित्रपटाच्या चित्रीकरणानंतर सलमान लुलियाच्या आई-वडिलांना जवळपासच्या भागात फिरण्यासाठी नेत असल्याचे समोर आले होते. गेल्या काही काळापासून सलमान खान आणि त्याची बहुचर्चित प्रेयसी लुलिया वंतूर यांच्या नात्यात दुरावा आल्यामुळेच लुलियाने तिच्या मायदेशी जाण्याचा निर्णय घेतल्याच्या चर्चांना उधाण आले होते. पण, तसे नाहीये. सध्या लुलिया म्हणजेच भाईजानची बहुचर्चित प्रेयसी भारतात आणि सलमानच्या ‘खान’दानमध्ये परत आली आहे.

सलमानचा धाकटा भाऊ सोहेल खानच्या मुलाच्या म्हणजेच निर्वान खानच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका समारंभामध्ये संपूर्ण खान कुटुंबासह लुलिया वंतूरनेही हजेरी लावल्याचे दिसले होते. यावेळी नेहमीप्रमाणेच या समारंभासाठी लुलिया आणि सलमानने एकत्र येणे टाळले. निर्वानच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये सोहेल खान, विकास बहल, सपना पब्बी, नमिक पॉल यांसारख्या सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. दरम्यान या पार्टीमध्ये लुलियाने अनेकांचेच लक्ष वेधले होते.