News Flash

‘भारत अने नेनू’ २३० कोटींच्या घरात !

बॉक्स ऑफिसवरील या चित्रपटाची कमाई पाहता हा चित्रपट जवळपास सर्वच मोडीत काढणार असल्याचे दिसून येत आहे.

mahesh babu
महेश बाबू

एस एस राजामौली यांच्या ‘बाहुबली’ चित्रपटाच्या कमाईवर मात करत देशभरातल्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या ‘भारत अने नेनू’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. सध्या या दाक्षिणात्य चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. बॉक्स ऑफिसवरील या चित्रपटाची कमाई पाहता हा चित्रपट जवळपास सर्वच मोडीत काढणार असल्याचे दिसून येत आहे.

‘भारत अने नेनू’ हा चित्रपट प्रदर्शित होताच केवळ दोन दिवसांमध्ये त्याने १०० कोटींचा गल्ला जमवला होता. हा आकडा दिवसेंदिवस वाढत जाऊन आता तो २३० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. या चित्रपटामध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू याने आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका साकारली आहे.

विशेष म्हणजे या चित्रपटाची जादू भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील चालल्याचे दिसून येत आहे. या चित्रपटाने अमेरिकेमध्ये ३५ लाख डॉलर्सची कमाई केल्याचे सांगण्यात येत आहे. हा चित्रपट आतापर्यंत ४५ देशांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

दरम्यान, जगभरातील सर्वाधिक पसंती मिळविणा-या चित्रपटांच्या यादीमध्ये मेहश बाबूच्या चित्रपटाने स्थान पटकावले आहे. या चित्रपटामध्ये राजकीय कथानकाला एक रंजक वळण देत कोरटला शिवा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2018 6:12 pm

Web Title: bharat ane nenu box office rakes in rs 230 crore
Next Stories
1 ‘अॅव्हेंजर्स- इन्फिनिटी वॉर’ची भारतात रेकॉर्डब्रेक कमाई, १३ दिवसांत तब्बल २०० कोटींची कमाई
2 नेहाच्या ‘त्या’ लेहंग्याची किंमत **/- लाख
3 ‘मराठी चित्रपटात सकारात्मक बदल होतोय’