25 February 2021

News Flash

‘हसण्यासोबतच घाबरण्यासाठी तयार रहा’; भूत पोलिस येत आहे!

आणखी एक हॉरर कॉमेडी सिनेमा

2020 हे साल हे सिनेसृष्टीसाठी मोठं तोट्याचं ठरलं. करोनाचं संकट आणि लॉकडाउनमुळे अनेक सिनेमांचं चित्रीकरण थांबलं. तर नवे प्रोजेक्टसही रखडले. मात्र नव्या वर्षात परिस्थिती काहीशी बदलल्यानं निर्मात्यांनी सिनेमांच्या घोषणांची जणू स्पर्धाच लावली आहे. दररोज अनेक बड्या स्टार्सच्या सिनेमांची घोषणा होत आहे.

यातच आता आणखी एक भर पडली आहे. सैफ अली खानचा आगामी मल्टीस्टार सिनेमा ‘भूत पोलिस’चं पोस्टर रिलीज करण्यात आलंय. या सिनेमात सैफसोबत, अर्जुन कपूर, जॅकलिन फर्नांडिस आणि यामी गौतम असे उमदे कलाकार झळकणार आहेत. जॅकलिनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सिनेमाचं पोस्टर शेअर केलंय. यासोबतच सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आलीय. 10 सप्टेंबरला ‘भूत पोलिस’ सिनेमा रिलीज होणार आहे.

जॅकलिनने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये चार व्यक्ती एका भयाण ठिकाणी उभे असल्याचं दिसतंय. या व्यक्ती पाठमोऱ्या उभ्या आहेत. ‘ हसण्यासोबतच आता घाबरण्यासाठी तयार रहा’ असं कॅप्शन या पोस्टरला जॅकलिनने दिलंय. या कॅप्शनवरुनच हा सिनेमा हॉरर कॉमेडी असल्याचं लक्षात येतंय.

येत्या काळात अनेक हॉरर कॉमेडी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यात मार्च महिन्यात राजकुमार राव आणि जान्हवी कपूरचा ‘रुही’ हा सिनेमादेखील आहे. त्याचसोबत वरुण धवनच्या हॉरर कॉमेडी ‘भेडिया’ या सिनेमाची घोषणादेखील नुकतीच करण्यात आली

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2021 5:53 pm

Web Title: bhoot police movie poster out cast saif ali khan arjun kapoor and yami goutam kpw 89
Next Stories
1 करीना रुग्णालयातून परतली घरी; समोर आला व्हिडीओ
2 ‘देसी गर्ल’ गाण्यावर आराध्याने केला अभिषेक-ऐश्वर्यासोबत डान्स, व्हिडीओ व्हायरल
3 ‘तान्हाजी’फेम अभिनेत्याची नवी मालिका; साकारणार ‘ही’ महत्त्वपूर्ण भूमिका
Just Now!
X