कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामधून दर आठवड्याला कोणीतरी एक स्पर्धक घराबाहेर जातो. तसंच या आठवड्यामध्येदेखील एका स्पर्धकाला घराबाहेर जावं लागलं. जुई गडकरी, राजेश शृंगारपुरे आणि रेशम टिपणीस हे डेंजर झोनमध्ये होते. मात्र राजेशला कमी मतं मिळाल्यामुळे त्याला बिग बॉसच्या घराला रामराम ठोकावा लागला. राजेशच्या जाण्याने रेशम, उषा नाडकर्णी, सुशांत, आस्ताद, जुई, भूषण सर्वच खूप भावुक झाले.

नेहेमीप्रमाणे बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडलेल्या सदस्याला महेश मांजरेकर घरातील सदस्यांशी बोलण्याची संधी देतात. ही संधी राजेशलाही मिळाली. त्याने आपल्या जवळच्या व्यक्तींना योग्य तो सल्ला देत उत्तोमोत्तम खेळण्यास सांगितले. पण राजेशच्या बाहेर जाण्याचे मुख्य कारण महेश मांजरेकर यांनी स्वतःच सांगितले. कार्यक्रमात मांजरेकर राजेशला म्हणाले की, ‘तू तुझ्या खेळामुळे किंवा खेळातील टास्कमुळे बाहेर गेला नसून, रेशमसोबतची तुझी नको तेवढी जवळीक तुला विजेतेपदापासून दूर घेऊन गेली.’ प्रेक्षकांना दोघांमधील जवळीक फारशी आवडली नाही. याचाच फटका दोघांच्या मतांवर पडला. अखेर सर्वात कमी मतं मिळवून राजेश शृंगारपुरे बिग बॉस मराठीच्या घरातून कायमचा बाहेर पडला.

दरम्यान स्मिताने उषाजींना गुलाबाचे फुल दिले आणि उषाजींनी स्मिताची बरेच कौतुकदेखील केले. तर दुसरीकडे उषाजींनी मेघाला ती खूप बोलते म्हणून प्रेमाने काट्यांचा मान दिला, तर त्यांच्या लाडक्या पुष्करला मात्र फुलांचा मान मिळाला. भूषणने सुशांतला तर हर्षदाने रेशमला फुलाचा मान दिला. रेशमने आणि भूषणने मेघाला काट्यांचा मान दिला. सईने राजेशला काटे तर मेघाला गुलाबाचा मान दिला.

अज्ञातवासात राहिल्यानंतर राजेश शृंगारपुरे या आठवड्यामध्ये बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर पडला. आता येत्या आठवड्यामध्ये कोण नॉमिनेट होईल? प्रेक्षकांचे मत कोणाला वाचवेल? कोण घराबाहेर जाईल? हे पाहणए रंजक असणार आहे. तेव्हा पाहायला विसरू नका बिग बॉस मराठी सोम ते शनि रात्री ९.३० वा. आणि दर रवि रात्री ९.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.