11 December 2018

News Flash

Big Boss 11- माझ्या मुलीला शिव्या देऊ नका, शिल्पा शिंदेच्या आईने केली विनंती

तुम्ही शिल्पाला आई म्हणता तर मग तिला शिव्या देऊ नका

बिग बॉस ११ च्या येत्या भागात प्रेक्षकांना इमोशनल ड्रामा पाहायला मिळेल. येत्या गुरूवारी स्पर्धकांचे नातेवाईक त्यांना भेटायला बिग बॉसच्या घरात येणार आहेत. हा एक लक्झरी बजेट टास्क असणार आहे. या टास्कमध्ये बिग बॉस साऱ्यांनाच स्टॅच्यू होण्यास सांगतात. या काळात स्पर्धक आपल्या घरातल्यांशी बोलू शकत नाहीत. ते कितीवेळ स्वतःवर संयम ठेवू शकतात, याची ही परीक्षा असणार आहे. पण थोड्यावेळाने बिग बॉसने त्यांना बोलण्याची मुभा दिल्यानंतर स्पर्धकांना आपल्या भावनांना आवर घालणे शक्य होत नाही. त्यामुळेच येत्या भागात घरातील स्पर्धक रडताना दिसणार आहेत. यामध्ये सर्वाधिक चर्चा रंगली आहे ती शिल्पा शिंदे हिची.

असे म्हटले जात होते की, वैयक्तिक आयुष्यात शिल्पा आणि तिच्या आईचे फारसे पटत नाही. तरीही शिल्पाची आई तिला भेटायला बिग बॉसच्या घरात आली. यावेळी तिने शिल्पा आणि स्पर्धकांना समंजसपणाच्या चार गोष्टी सांगितल्या. तुम्ही शिल्पाला आई म्हणता तर मग तिला शिव्या देऊ नका. आयुष्यात आईचे स्थान खूप मोठे असते. तुम्ही त्याचा मान ठेवा आणि मी काही जास्त बोलून गेले असेन तर मला माफ करा. शिल्पाच्या आईचे भावूक बोलणे ऐकून शिल्पा, पुनीश आणि विकास रडायला लागले.

पुनीश शर्माचे बाबाही त्याला भेटायला आले होते. पुनीशच्या बाबांनी शिल्पाला सांगितले की, पुनीशच्या आईला तुला भेटण्याची खूप इच्छा आहे. यावेळी पुनीशही आपल्या बाबांना भेटल्यानंतर ढसाढसा रडला. हे पाहून तिथे असणारे इतर स्पर्धकही रडायला लागले.

यावेळी प्रियांकची पुर्वाश्रमीची प्रेयसी दिव्या अग्रवालही घरात आली होती. दिव्याला पाहून प्रियांकही भावूक झाला. दिव्या आणि प्रियांक यांची ओळख स्प्लिट्सव्हिला १० या शोमध्ये झाली होती.  बिग बॉसच्या घरात प्रियांक आणि बेनाफ्शा यांच्यातील जवळीक पाहून तिने प्रियांकशी ब्रेकअप केल्याची चर्चा होती.

First Published on December 7, 2017 3:36 pm

Web Title: bigg boss 11 luxury budget task puneesh sharma shilpa shinde family members will come to visits in bigg boss 11 house watch full video