News Flash

अनुप जलोटा यांच्याशी असलेल्या नात्याविषयी जस्लीनचे वडील म्हणतात…

शांत-गंभीर स्वभावामुळे अनुप जलोटा ओळखले जातात. मात्र बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यानंतर काही क्षणांत त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं.

अनुप- जसलीन यांचं ब्रेकअप; जसलीनच्या वडिलांना झाला आनंद

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो ‘बिग बॉस’च्या बाराव्या पर्वाला नुकतीच सुरुवात झाली आहे. विचित्र जोडी या संकल्पनेवर आधारित असलेल्या या नव्या पर्वाचा पहिलाच भाग भजन गायक अनुप जलोटा यांच्यामुळे विशेष गाजला. अनुप यांनी बिग बॉसच्या मंच्यावर २८ वर्षीय जस्लीन मथारुला डेट करत असल्याचा खुलासा केला. त्यांच्या या खुलाशानंतर सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात आला. त्यामुळेच या संबंधित प्रकरणावर जस्लीनच्या वडीलांनी पहिल्यांदाच त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

शांत-गंभीर स्वभावामुळे अनुप जलोटा ओळखले जातात. मात्र बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यानंतर काही क्षणांत त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं.ज्यामुळे साऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. अनुप यांनी जस्लीनबरोबरचं त्यांचं नातं जगजाहीर केलं असलं तरी जस्लीनने अद्यापतरी यावर तिची कोणती प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र अनुप आणि जस्लीनविषयीची माहिती ऐकून आम्हाला धक्का बसल्याचं सांगत जस्लीनच्या वडीलांनी त्याचं मौन सोडलं आहे.

‘जस्लीन बिग बॉसच्या १२ व्या पर्वात सहभागी होणार हे आम्हाला माहित होतं. त्यामुळे आम्ही आनंदीदेखील होतो. परंतु ज्यावेळी अनुप जलोटा यांनी जस्लीनविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं ते ऐकून आम्हीदेखील आश्चर्यचकित झालो. सध्या जस्लीन बिग बॉसचा खेळ खेळत आहे. त्यामुळे आतातरी तिच्याशी याविषयावर चर्चा करता येणार नाही. मात्र ती जेव्हा या घरातून बाहेर पडेल तेव्हा नक्कीच तिच्याशी याबद्दल बोलणार असल्याचं’ केसर मथारु यांनी सांगितलं.

पुढे ते असंही म्हणाले, ‘जस्लीन एका चांगल्या कुटुंबामध्ये जन्मलेली मुलगी आहे. तिने तिच्या हिमतीवर या कलाक्षेत्रात स्वत: च नाव कमावलं आहे. त्यामुळे तिला अशा खोट्या आणि वाईट मार्गाने निर्माण होत असलेल्या प्रसिद्धीची गरज नाही. सध्या तिच्याविषयी अनेक उलटसुलट चर्चा सुरु आहेत. मात्र यावरुन आम्हाला काही फरक पडत नाही. ती बिग बॉसच्या या पर्वाची विजेती व्हावी हिच आमची इच्छा आहे’.

दरम्यान, रविवारी झालेल्या ‘बिग बॉस’च्या पहिल्या भागामध्ये अनुप यांनी जस्लीनबरोबर असलेल्या नात्याविषयी खुलासा केला होता. त्यानंतर अनुप आणि जस्लीन यांच्यावर अनेक स्तरावरुन टीका होऊ लागली. अनेक नेटकऱ्यांनी तर अनुप आणि जस्लीनची तुलना निक- प्रियांकाबरोबर केली. जस्लीन ही अनुप जलोटा यांच्यापेक्षा ३७ वर्षांनी लहान असल्याचं सांगण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2018 12:02 pm

Web Title: bigg boss 12 jasleen father reaction to her relationship with anup jalota is shocking
Next Stories
1 Ganesh Utsav 2018 : पाहा, गणरायासाठी प्रिया बापटची स्वरसाधना
2 अमेयनं दिलेलं आव्हान तुम्ही स्वीकारणार का?
3 ‘राजी’ दिग्दर्शिका मेघना गुलजारच्या आगामी चित्रपटात दीपिका?
Just Now!
X