24 October 2020

News Flash

‘तो मला मारहाण करायचा’; सिद्धार्थबद्दल शिल्पा शिंदेचा धक्कादायक खुलासा

शिल्पा म्हणाली, "होय, माझं सिद्धार्थसोबत अफेअर होतं."

शिल्पा शिंदे, सिद्धार्थ शुक्ला

एकीकडे ‘बिग बॉस’च्या तेराव्या पर्वाच्या अंतिम फेरीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले असता आता ‘बिग बॉस’ची गतविजेती शिल्पा शिंदे हिने स्पर्धक सिद्धार्थ शुक्लाविषयी धक्कादायक खुलासा केला आहे. सिद्धार्थ माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये होता आणि त्याने अनेकदा मला मारहाणसुद्धा केली, असा गौप्यस्फोट शिल्पाने केला आहे. ‘स्पॉटबॉय ई’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत तिने हा खुलासा केला.

“होय, माझं सिद्धार्थसोबत अफेअर होतं. मात्र त्याचा स्वभाव फार तापट आणि हिंसक आहे. रिलेशनशिपमध्ये तो फार असुरक्षित होता आणि अनेकदा त्याने मला मारहाणसुद्धा केली”, असं ती म्हणाली. याचसोबत असा व्यक्ती हा रिअॅलिटी शो कधीच जिंकू नये अशी भावनासुद्धा तिने व्यक्त केली. “असं घडलंच नाही पाहिजे. सिद्धार्थसारखा व्यक्ती हा शो जिंकूच नये. तो या विजेतेपदाच्या लायकीचा नाही”, अशा शब्दांत शिल्पाने राग व्यक्त केला.

आणखी वाचा : सारा-कार्तिकच्या ‘लव्ह आज कल’ने पहिल्या दिवशी कमावले इतके कोटी रुपये

‘बिग बॉस’च्या तेराव्या पर्वाचा ग्रँड फिनाले रविवारी पार पडणार आहे. सिद्धार्थ शुक्ला या शोच्या सुरुवातीपासूनच सोशल मीडियावर चर्चेत आहे. तो हा शो जिंकू शकतो, असंही अनेकांचं मत आहे. त्यामुळे ग्रँड फिनालेच्या काही वेळापूर्वी शिल्पाने केलेला खुलासा त्याला कितपत भोवणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2020 6:29 pm

Web Title: bigg boss 13 shilpa shinde says sidharth shukla was in a violent and aggressive relationship with her ssv 92
Next Stories
1 सारा-कार्तिकच्या ‘लव्ह आज कल’ने पहिल्या दिवशी कमावले इतके कोटी रुपये
2 जंगजौहर : पावनखिंडीचा रणसंग्राम रुपेरी पडद्यावर
3 चिन्मय उदगीरकर-प्रितम कागणेचा रोमॅण्टीक अंदाज
Just Now!
X