News Flash

…म्हणून शरद केळकरने नाकारली ‘बिग बॉस’ची ऑफर

प्रत्येक नव्या पर्वात सहभागी होण्यासाठी मला ऑफर येत असते. मात्र...

शरद केळकर

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणजे बिग बॉस. या शोच्या प्रत्येक पर्वामध्ये कलाविश्वातील सेलिब्रिटी सहभागी होत असतात. सध्या या शोचं १३ वं पर्व सुरु आहे. यंदाच्या पर्वामध्ये अनेक लोकप्रिय कलाकारांनी सहभाग घेतला आहे. यात सिद्धार्थ शुक्ला,रश्मी देसाई,मधुरिमा तुली आणि विशाल आदित्य सिंह या कलाकारांचा समावेश आहे. बिग बॉसचं नवीन पर्व सुरु होण्यापूर्वी त्यात सहभागी कलाकारांच्या नावाची यादी जाहीर करण्यात येते. यामध्ये बऱ्याच वेळा कोणते कलाकार सहभागी होणार याविषयी चर्चा रंगते. यात बऱ्याचदा अभिनेता शरद केळकरचं नावदेखील येतं. मात्र अनेकदा बिग बॉसच्या ऑफर येऊनदेखील त्याने त्या नाकारल्या आहेत. त्यामागचं कारणं शरदने नुकतंच सांगितलं आहे.

का नाकारल्या शरदने बिग बॉसच्या ऑफर्स?
“बिग बॉसच्या प्रत्येक नव्या पर्वात सहभागी होण्यासाठी मला ऑफर येत असते. मात्र मी दरवेळी या शोमध्ये सहभागी होण्यासाठी नकार देतो. मला माझं वैयक्तिक आयुष्य साऱ्यांसमोर दाखवणं आवडत नाही. तसंच मी जसा आहे तसाच चाहत्यांसमोर जाणं मला पसंत आहे. उगाच चाहत्यांसमोर खोटं वागणं मला पसंत नाही. मी २४ तास सतत खोटं वागू शकत नाही आणि मला तसं व्हायचंही नाही”, असं शरदने सांगितलं.

 

View this post on Instagram

 

happy diwali @keertikelkar #kesha #festival #fun #food #happiness #happydiwali

A post shared by Sharad Kelkar (@sharadkelkar) on


वाचा : बंगला नव्हे राजमहाल; पाहा कसा दिसतो बिग बींचा ‘जलसा’

 दरम्यान, शरद लवकरच अजय देवगणच्या आगामी तान्हाजी : द अनसंग वॉरियर या चित्रपटात झळकणार आहे. यात तो छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट १० जानेवारी २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2019 1:47 pm

Web Title: bigg boss 13 tanhaji sharad kelkar rejects salman khan show every year ssj 93
Next Stories
1 सपना चौधरी थोडक्यात वाचली
2 या चित्रपटातून चंकी पांडे करणार मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण
3 “इस बार सामने गब्बर हो या शाकाल हम भी देखेंगे”; बिग बींच्या पोस्टवर अनुरागची प्रतिक्रिया
Just Now!
X