News Flash

मुंबईबाहेर ‘या’ ठिकाणी असेल ‘बिग बॉस १४’चं घर; पहिल्या स्पर्धकाचं नाव आलं समोर

'बिग बॉस'चं घर हा नेहमीच प्रेक्षकांच्या आकर्षणाचा विषय असतो.

'बिग बॉस'

छोट्या पडद्यावरील सर्वांत वादग्रस्त व चर्चेतला रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’चा नवा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याची तयारी सुरू झाली आहे. मात्र नव्या पर्वासाठी या शोमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यावेळी मुंबईत ‘बिग बॉस’चं घर नसेल. मुंबईबाहेर ‘बिग बॉस १४’चं घर बांधण्यात येणार असून त्याचं इंटेरिअर कसं असेल याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. या नव्या पर्वाच्या पहिल्या स्पर्धकाचं नावसुद्धा समोर आलं आहे.

‘बिग बॉस’चं घर हा नेहमीच प्रेक्षकांच्या आकर्षणाचा विषय असतो. यंदा दक्षिण गोव्यात हे घर बांधण्यात येणार आहे. ‘एनडी टीव्ही’नं दिलेल्या वृत्तानुसार, मॉडेल, अभिनेत्री व गायिका पूनम कारेकर या पर्वाची पहिली स्पर्धक आहे. याशिवाय जास्मिन भसिन, अलिशा पवार, करण कुंद्रा ही नावंसुद्धा चर्चेत आहेत.

आणखी वाचा : “माझ्या बायोपिकमध्ये सलमान खानने मुख्य भूमिका साकारावी”; पाकिस्तानच्या क्रिकेटपटूची इच्छा

‘बिग बॉस’चा तेरावा सिझन चांगलाच गाजला होता. शोची टीआरपी वाढविण्यासाठी निर्मात्यांकडून नवनवीन शक्कल लढवले गेले. या शोचा सूत्रसंचालक सलमान खानने बिग बॉसच्या घरात येऊन भांडी घासली होती, बाथरुम साफ केलं होतं. दिवसेंदिवस या शोची घसरती पातळी पाहून अनेकांनी या शोवर बंदी घालण्याचीही मागणी केली होती.

‘बिग बॉस १३’चा विजेता अभिनेता सिद्धार्थ शुक्ला ठरला होता. मात्र त्याच्या विजेतेपदावरही अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. तर रश्मी देसाई, असिम रियाज हे नाव या शोमधून खूप चर्चेत आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2020 11:10 am

Web Title: bigg boss 14 location changed first celebrity contestant name revealed ssv 92
Next Stories
1 मायलेकी TikTok वर मग्न; रवीनाने शेअर केला हटके डान्स व्हिडीओ
2 अनुप जलोटा जसलीनशी करणार लग्न? जाणून घ्या सत्य
3 “माझ्या बायोपिकमध्ये सलमान खानने मुख्य भूमिका साकारावी”; पाकिस्तानच्या क्रिकेटपटूची इच्छा
Just Now!
X