21 September 2020

News Flash

‘बिग बॉस मराठी’ फेम रुपालीने पुण्याच्या मॉलमध्ये ‘त्या’ खास व्यक्तीला केलं प्रपोज

रुपालीने गुडघ्यावर बसून अत्यंत रोमँटिक पद्धतीने त्याला प्रपोज केलं.

रुपाली भोसले

‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या सिझनमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली स्पर्धक रुपाली भोसले सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे प्रकाशझोतात आली आहे. रुपालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोद्वारे तिने खास मित्र अंकित मगरेसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलं होतं. हा फोटो पाहताच चाहत्यांनी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत या दोघांनी त्यांच्या या नव्या नात्याबद्दल बऱ्याच गोष्टी मनमोकळेपणाने सांगितल्या.

पहिली भेट कशी झाली?

रुपाली आणि अंकित काही कामानिमित्त एका कॉफी शॉपमध्ये पहिल्यांदा भेटले. पहिल्याच भेटीत अंकितचा साधेपणा, शांत स्वभाव आणि त्याचं हास्य रुपालीच्या मनाला भावलं. तर अंकितलाही पहिल्याच भेटीत रुपाली आवडली होती.

अंकितबद्दल रुपाली म्हणाली, “अंकितचा स्वभाव फार सकारात्मक आहे. त्याच्या व्यग्र कामातून तो माझ्यासाठी नेहमीच वेळ काढतो. माझ्या कामाचाही तो फार आदर करतो. या नात्याबद्दल बऱ्याच खास गोष्टी आहेत.” तर या नात्यात माझ्यापेक्षा जास्त प्रेम रुपाली करते असं अंकितचं म्हणणं आहे. “रुपाली ही काळजी घेणारी, साथ देणारी व्यक्ती आहे. तिच्या प्रत्येक कामात ती परफेक्ट आहे”, असं त्याने सांगितलं.

रुपालीने मॉलमध्ये गुडघ्यावर बसून अंकितला केलं प्रपोज

प्रत्येक नात्यात कोणी कोणाला कसं प्रपोज केलं हे जाणून घेण्यासाठी चाहते फार उत्सुक असतात. सहसा मुलं मुलींना प्रपोज करतात. पण रुपालीने अंकितला अत्यंत रोमँटिक स्टाइलने प्रपोजत केलं आहे. याविषयी अंकितने सांगितलं, “पुण्यातील एका शॉपिंग मॉलमध्ये असताना रुपाली अचानक थोड्या वेळासाठी गायब झाली होती. ती जेव्हा माझ्या समोर आली तेव्हा तिच्या हातात गुलाबाचं फूल होतं. मॉलमध्ये ती गुडघ्यावर बसली आणि मला प्रपोज केलं. ते खास क्षण माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात कायम राहतील. रुपालीसारखी मुलगी मला भेटणं हे मी माझं भाग्य समजतो.”

लग्नाचा प्लॅन

सध्या तरी लग्न करण्याचा विचार नसल्याचं रुपाली आणि अंकितने स्पष्ट केलं. आम्ही दोघंही सध्या करिअरमध्ये फार व्यग्र आहोत आणि एकमेकांसोबत आणखी काळ एकत्र घालवण्यावर आमचा भर आहे, असं ते म्हणाले. या नात्याला अवघा एक महिना झाल्याने लग्नाची घाई तरी इतक्यात करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2020 3:09 pm

Web Title: bigg boss marathi 2 fame rupali bhosle went down on her knees and proposed beau ankit magare ssv 92
Next Stories
1 नैराश्यामुळे आलियाच्या बहिणीने केला होता आत्महत्येचा प्रयत्न
2 लवकर गेलास म्हणत लक्ष्याचा आठवणीने अशोक सराफ भावुक
3 कार्तिक आर्यनने आईला दिले ४० लाखांचे गिफ्ट
Just Now!
X