21 January 2021

News Flash

Bigg Boss Marathi 2: हिना-परागमध्ये पुन्हा पडणार वादाची ठिणगी!

बिग बॉस व वाद हे जणू समीकरणच आहे.

बिग बॉस मराठी २ च्या घरामध्ये काही दिवसांपूर्वीच प्रवेश केलेली स्पर्धक हिना पांचाळ सध्या चांगलीच चर्चेत आहे. घरात प्रवेश केल्यापासून हिनाचं वागणं घरातील काही स्पर्धकांना खटकत आहे. त्यामुळे या ना त्या कारणाने काही सदस्य सतत तिच्याशी वाद घालताना दिसतात. घरात काल रंगलेल्या “हिशोब पाप पुण्याचा” या नॉमिनेशन टास्कदरम्यान हिनाचं पराग कान्हेरेसोबत जोरदार भांडण झालं होतं. या भांडणानंतर आता पुन्हा एकदा तिचं परागसोबत भांडण होणार आहे.

काल झालेल्या नॉमिनेशन टास्कदरम्यान हिनाने रागाच्या भरामध्ये परागला धोकेबाज म्हटलं होतं. हिनाच्या या वक्तव्यानंतर या दोघांमधील वाद चांगलाच पेटला. मात्र काही काळानंतर हे भांडण शमलं. कालच्याच टास्कदरम्यान शिव व नेहा यांच्यातही वाद झाला. टास्क खेळताना नेहाचं वागणं शिवला पटलं नाही आणि त्यावरूनच दोघांमध्ये वाद झाला.

हिना-परागचं भांडणं इथेच संपलं नसून दोघांमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडणार आहे. मात्र पुन्हा वाद कशामुळे होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पराग कान्हेरे या पर्वाच्या सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. तर हिनाने बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एण्ट्री घेतली होती. बिग बॉसची स्पर्धा जिंकण्यासाठी प्रत्येक स्पर्धक आपापल्या परीने प्रयत्न करत आहे. मात्र त्यादरम्यान होणारे वाद प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2019 1:52 pm

Web Title: bigg boss marathi 2 parag and heena altercation ssj 93
Next Stories
1 ‘अर्जुन रेड्डी’ फेम विजय देवरकोंडा या अभिनेत्रीला करतोय डेट?
2 ‘सेक्रेड गेम्स २’ लांबणीवर जाण्यामागचं नेमकं कारण तरी काय?
3 बॉक्स ऑफिसवर ‘कबीर सिंग’ची सेंच्युरी!
Just Now!
X