12 November 2019

News Flash

Bigg Boss Marathi 2 : घरात आल्यावर किशोरी शहाणेंनी गमावली ‘ही’ अमूल्य वस्तू

किशोरी आता घरात एकट्या पडल्या आहेत

किशोरी शहाणे

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो अर्थात बिग बॉस मराठीचं दुसरं पर्व चांगलंच गाजतंय. या पर्वाला सुरुवात होऊन एक महिना झाला असून घरातील सदस्य त्यांच्या कुटुंबीयांपासून दूर आहेत. त्यामुळे अनेक वेळा घरातील सदस्य एकमेकांकडे त्यांचं मन मोकळ करतात. घरात शांत आणि सामंजस्याने प्रत्यके गोष्टीला सामोऱ्या जाणाऱ्या किशोरी शहाणेदेखील अनेक वेळा हिनाकडे त्यांचं मन मोकळ करत असतात. त्यातच त्यांनी बिग बॉसच्या घरात आल्यानंतर एक अमूल्य गोष्ट गमावल्याचं हिनाला सांगितलं. ‘अनसीन अनदेखा’च्‍या व्हिडिओमध्ये त्या या गोष्टीबद्दल सांगत असल्याचं दिसून आलं.

बिग बॉसच्या घरात येण्यापूर्वी किशोरी यांच्या मुलाने बॉबीने त्यांनी एक परफ्युम गिफ्ट म्हणून दिलं होतं. हे गिफ्ट त्या बिग बॉसच्या घरातही घेऊन आल्या होत्या. मात्र चोरबाजार टास्क खेळताना त्यांना हे गिफ्ट गमवावं लागलं.

चोरबाजार टास्कमध्ये विरुद्ध टिमने किशोर यांचं परफ्युम चोरलं होतं. हे परफ्युम परत देण्यासाठी विरुद्ध टीमने त्यांच्याकडे भरपूर पॉईंट्स मागितले. मात्र हे पाईंट देणं किशोरी यांना शक्य झालं नाही. त्यामुळे त्यांना हे परफ्युम गमवावं लागलं. ही परफ्युम गमावल्यानंतर किशोरी शहाणे प्रचंड उदास झाल्या होत्या. पुढील प्रवासामध्ये हे गिफ्ट त्यांच्यासोबत नसेल या कल्पनेनेच त्यांना वाईट वाटलं, असं त्यांनी हिनाला सांगितलं.

दरम्यान, पराग कान्हेरे घरातून बाहेर पडल्यानंतर वीणा ,रुपाली आणि किशोरी यांच्यामध्ये अनेक मतभेद झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच वीणा आणि रुपाली यांच्यासोबत किशोरी यांचे खटके उडाल्यामुळे त्या आता घरात एकट्या पडल्या आहेत. त्यामुळेच आता त्या त्यांच्या गोष्टी हिनासोबत शेअर करत आहेत.

First Published on July 14, 2019 11:21 am

Web Title: bigg boss marathi kishori shane lost special gift ssj 93