19 September 2020

News Flash

Photo : महेश मांजरेकरांचा बिग बॉस मराठीमधील मराठमोळा अंदाज पाहिलात का ?

महेश मांजरेकर अस्सल मराठमोळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत

टेलिव्हिजन विश्वातील वादग्रस्त कार्यक्रम बिग बॉस मराठीच्या पहिल्या यशस्वी पर्वानंतर, कलर्स मराठी आता बिग बॉस मराठीचा दुसरा पर्व घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या पर्वाची घोषणा झाल्यापासून प्रत्येक प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. गेल्या पर्वाप्रमाणेच यंदाच्या पर्वाचं सूत्रसंचालनदेखील महेश मांजरेकर करणार आहे. नुकताच या पर्वाचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या प्रोमोनंतर त्याचा आणखी एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यात ते एका आगळ्यावेगळ्या रुपात पाहायला मिळणार आहेत.

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या प्रोमोमध्ये महेश मांजरेकर एका राजकीय नेत्याच्या वेशभूषेत पाहायला मिळाले होते. त्यांच्या या लूकला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसादही मिळाला होता. त्यानंतर लवकरच या पर्वाचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या प्रोमोमध्ये महेश मांजरेकर अस्सल मराठमोळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

या नव्या लूकमध्ये ते फेटा, कुर्ता अशा लूकमध्ये दिसणार आहे. हा प्रोमो एका चित्रपटामधील क्लिप सारखा दिसत आहे. यामध्ये सुंदर लावणी सादर होताना दिसत आहे. त्यामध्ये महेश मांजरेकरही पारंपारिक रुपात दिसत असल्यामुळे कलेशीसंबंधित एखाद्या व्यक्तीचा या घरात प्रवेश तर होणार नाही ना असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2019 4:41 pm

Web Title: bigg boss marathi season 2 mahesh manjrekar new look details inside
Next Stories
1 जेम्स बॉण्डचा २५ वा चित्रपट, मानधन ऐकून व्हाल थक्क
2 अॅव्हेंजर्सची पहिल्याच दिवसाची कमाई माहित आहे का? पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल
3 Video : मित्राकडूनच अंकिताचा किसिंग व्हिडिओ व्हायरल
Just Now!
X