बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येला आता एक महिन्यांपेक्षा अधिक वेळ होऊन गेला आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत ३८ जणांची चौकशी केली आहे. मात्र सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परिणामी या प्रकरणाची चौकशी आता सीबीआयकडे सोपवण्यात यावी, अशी विनंती सातत्याने केली जात आहे. मात्र बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी सीबीआय चौकशीची गरज नसल्याचं म्हटलं आहे. सुशांतला न्याय देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत असं ते म्हणाले.

“सुशांतच्या वडिलांकडे त्याचा फोन नंबर नव्हता”; अंकिता लोखंडेचा धक्कादायक खुलासा

“दान नकोय आम्हाला काम हवय”; जेष्ठ अभिनेत्री महाराष्ट्र सरकारवर संतापल्या

मुंबई पोलिसांसोबत आता बिहारचे पोलीस देखील सुशांत मृत्यू प्रकरणाची चौकशी करत आहेत. या दरम्यान डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी सुशांत प्रकरणाची माहिती देण्यासाठी एक पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी CBI चौकशीची गरज नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, “आम्ही सुशांत प्रकरणाची कसून चौकशी करत आहोत. आतापर्यंत आम्ही सुशांतचा कुक, त्याची बहिणी, त्याचे डॉक्टर, महेश शेट्टी आणि अंकिता लोखंडे यांची चौकशी केली आहे. शिवाय मुंबई पोलिसांनी ज्यांची चौकशी केली त्यांना देखील आम्ही लवकरच भेटू. सुशांतच्या कुटुंबीयांना आमच्यावर पुर्ण विश्वास आहे. सुशांत केवळ बिहारचाच नाही तर पूर्ण देशाचा मुलगा होता. खऱ्या गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी आम्ही समर्थ आहोत त्यामुळे सीबीआयची गरज नाही. सुशांतला न्याय मिळवून दिल्या शिवाय आम्ही शांत बसणार नाही”

सुशांतची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात पाटणा येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं. त्यात सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांनी इंडिया टुडेशी बोलताना मुंबई पोलिसांना आधीच माहिती दिली होती, असा दावा केला आहे. “सुशांतच्या कुटुंबीयांनी मुंबईतील वांद्रे पोलिसांना २५ फेब्रुवारी रोजी याची माहिती दिली होती. सुशांत चुकीच्या लोकांच्या संगतीत आहे. या प्रकरणात पोलिसांनी लक्ष घालावे, जेणेकरून त्याचं नुकसान होणार नाही. ही माहिती पोलिसांना देण्यात आली तेव्ही सुशांत पूर्णपणे रिया चक्रवर्तीच्या नियंत्रणाखाली गेलेला होता,” असं सिंह म्हणाले.