News Flash

हरियाणा ते बिहार, १२०० किमी चा प्रवास सायकल प्रवास करणाऱ्या ज्योतीची कहाणी रुपेरी पडद्यावर

ऑगस्ट महिन्यापासून चित्रीकरणास सुरुवात

करोना विषाणूचा सामना करण्यासाठी देशभरात काही दिवसांपूर्वी लॉकडाउन जाहीर करण्यात आलं होतं. या काळात आपल्या वडिलांना सायकलच्या मागच्या सीटवर बसवून हरियाणातील गुडगावपासून बिहारपर्यंत १२०० किमीचा प्रवास करणारी ज्योती कुमारी चांगलीच चर्चेत आली होती. सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये ज्योतीची कहाणी समजल्यानंतर सर्व स्तरातून तिचं कौतुक झालं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीनेही ज्योतीचं कौतुक केलं. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने ज्योतीला लॉकडाउन संपल्यानंतर दिल्लीत ट्रायल्स देण्यासाठी बोलावलं होतं. परंतू ज्योतीने ही ऑफर नाकारत आपलं शिक्षण पूर्ण करण्याला पहिलं प्राधान्य दिलं. ज्योतीच्या याच संघर्षाची कथा आता रुपेरी पडद्यावर येणार आहे.

Wemakefilmz या कंपनीने ज्योतीच्या या संघर्षमय कहाणीचे हक्क विकत घेतले असून ऑगस्ट महिन्यापासून चित्रीकरणास सुरुवात होणार आहे. या चित्रपटाचं नाव ‘आत्मनिर्भर’ असं ठेवण्यात आलं असून यामध्ये ज्योती छोटीशी भूमिकाही करणार आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. या चित्रपटात ज्योतीच्या कहाणीसोबतच लॉकडाउन काळात तिला वडिलांसोबत सायकलने प्रवास का करावा लागला?? या प्रश्नाचाही वेध घेतला जाणार असल्याचं कळतंय. ही ऑफर स्विकारुन मला खूप आनंद होतोय अशी प्रतिक्रीया ज्योतीने पीटीआयशी बोलताना दिली.

गुडगाव ते दरभंगा या मार्गावर या सिनेमाचं चित्रीकरण होणार असून, या प्रवासादरम्यान तिला काय-काय अनुभव आले हे आम्ही मांडण्याचा प्रयत्न करणार असल्याचं चित्रपटाचे दिग्दर्शक शाईन क्रिष्णा यांनी सांगितलं. हिंदी, इंग्रजी आणि मैथिली भाषेत बनवली जाणार असून अन्य भाषांमध्येही या चित्रपटाचं डबिंग केलं जाणार आहे. या चित्रपटात ज्योतीच्या वडिलांची भूमिका कोण करेल हे अद्याप निश्चीत झालेलं नसल्याचं दिग्दर्शकांनी सांगितलं. आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी हा चित्रपट ‘A Journey of a Migrant’ या नावाने प्रसिद्ध होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 4:51 pm

Web Title: bihar girl who cycled 200 km with injured father to play herself in atmanirbhar movie psd 91
Next Stories
1 विभक्त झाल्यानंतर ब्रॅड पिट पहिल्यांदाच अँजेलिनाच्या घरी; दोन तास घालवले एकत्र
2 …तेव्हा झहीरच्या पत्नीसाठी कार्तिकने बॅरिकेट्सवरुन मारली होती उडी
3 विठू नामाच्या गजरात एकरूप होण्यासाठी झी टॉकीजवर खास कार्यक्रम!
Just Now!
X