बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांसोबतच आता बिहार पोलीस देखील करत आहेत. बिहार पोलिसांनी या प्रकरणी दिग्दर्शक रूमी जाफरी यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. सुशांत आणि रियासोबत ते एका चित्रपटाची निर्मिती करणार होते. परंतु काही कारणांमुळे त्यांनी तो प्रोजेक्ट रद्द केला. मृत्यूपुर्वी ते सुशांतच्या संपर्कात होते असं म्हटलं जात आहे. परिणामी बिहार पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलावलं आहे.

“सुशांतच्या वडिलांकडे त्याचा फोन नंबर नव्हता”; अंकिता लोखंडेचा धक्कादायक खुलासा

टाईम्स नाऊ दिलेल्या वृत्तानुसार रूमी जाफरींसोबतच ‘दिल बेचारा’ या चित्रपटात काम करणाऱ्या काही कलाकारांचीही चौकशी केली जाणार आहे. ‘दिल बेचारा’ हा सुशांतचा शेवटचा चित्रपट होता. या चित्रपटाच्या वेळी त्याची मानसिक स्थिती कशी होती? तो कोणाच्या प्रभावाखाली होता का? आर्थिक स्थितीमुळे तो त्रस्त होता का? अशा अनेक प्रश्नांची उत्तर या कलाकारांची चौकशी करुन पोलीस शोधण्याचा पोलीस प्रयत्न करतील.

“दान नकोय आम्हाला काम हवय”; जेष्ठ अभिनेत्री महाराष्ट्र सरकारवर संतापल्या

यापूर्वी बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी सुशांत प्रकरणाची माहिती देण्यासाठी एक पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये त्यांनी CBI चौकशीची गरज नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, “आम्ही सुशांत प्रकरणाची कसून चौकशी करत आहोत. आतापर्यंत आम्ही सुशांतचा कुक, त्याची बहिणी, त्याचे डॉक्टर, महेश शेट्टी आणि अंकिता लोखंडे यांची चौकशी केली आहे. शिवाय मुंबई पोलिसांनी ज्यांची चौकशी केली त्यांना देखील आम्ही लवकरच भेटू. सुशांतच्या कुटुंबीयांना आमच्यावर पुर्ण विश्वास आहे. सुशांत केवळ बिहारचाच नाही तर पूर्ण देशाचा मुलगा होता. खऱ्या गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी आम्ही समर्थ आहोत त्यामुळे सीबीआयची गरज नाही. सुशांतला न्याय मिळवून दिल्या शिवाय आम्ही शांत बसणार नाही”