News Flash

“…तर शाहरुखशी केलं असतं का लग्न?”; काजोलने दिले होत भन्नाट उत्तर

आज काजोलच्या वाढदिवशी जाणून घ्या काही खास किस्से..

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख आणि अभिनेत्री काजोल यांची जोडी बॉलिवूडमधील हिट जोड्यांमधील एक आहे. या जोडीने एकेकाळी बॉक्स ऑफिसवर धूमाकुळ घातला होता. चाहत्यांना या जोडीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहायला आवडते. आज ५ ऑगस्ट रोजी बॉलिवूड अभिनेत्री काजोलचा वाढदिवस आहे. त्या निमित्त आपण तिचे काही खास किस्से जाणून घेणार आहोत. एकदा काजोलला चाहत्यांनी शाहरुखशी लग्न करण्याविषयी प्रश्न विचारला होता. त्यावर तिने भन्नाट उत्तर दिले होते.

काजोल सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती चाहत्यांशी सतत संवाद देखील साधत असते. एकदा तिने इन्स्टाग्रामवरील प्रश्न आणि उत्तर या फिचरद्वारे चाहत्यांशी संवाद साधला होता. दरम्यान एका चाहत्याने काजोलला जर तिच्या आयुष्यात अजय देवगण नसता तर तिने शाहरुख खानशी लग्न केले असते का? असा प्रश्न विचारला होता. त्यावर काजोलने दिलेल्या उत्तराने तुम्हालाही हसू येईल. ‘पुरुषाने प्रपोज करायचं असतं ना’ असे उत्तर तिने दिले होते. तिने दिलेल्या उत्तराची त्यावेळी प्रचंड चर्चा झाली होती.

शाहरुख आणि काजोलने ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘बाजीगर’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘माय नेम इज खान’, ‘दिलवाले’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. तसेच या जोडीने त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीने अनेकांची मने जिंकली होती. आता चाहते पुन्हा एकदा शाहरुख आणि काजोलला एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2020 10:24 am

Web Title: birthday special fan asks kajol if she not met ajay then would have married to shahrukh khan avb 95
Next Stories
1 ‘आमच्यात मैत्रीपलिकडे एक नातं होतं, पण…’; अजय- काजोलची लव्हस्टोरी
2 राम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर मराठी कलाकारांचंही ‘जय श्री राम’
3 ‘बाजीगर’च्या शूटिंगदरम्यान शिल्पा शेट्टीला ‘या’ कारणामुळे आला होता काजोलचा राग
Just Now!
X