News Flash

Birthday Special : ‘या’ अभिनेत्यासोबत तब्बू होती दहा वर्षे रिलेशनशीपमध्ये

वाढदिवशी जाणून घ्या तब्बू विषयी काही खास गोष्टी..

आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे तब्बू. आज ४ नोव्हेंबर रोजी तब्बूचा वाढदिवस आहे. तिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून हे चित्रपट हिट ठरले होते. फिल्मी करिअरसोबतच तब्बू तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत होती. एकेकाळी तिच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. तब्बू जवळपास १० वर्षे एका अभिनेत्यासोबत रिलेशमध्ये असल्याचे म्हटले जाते.

वयाच्या १४ व्या वर्षी तब्बूने ‘हम नौजवान’ या पहिल्यावहिल्या चित्रपटात काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. या चित्रपटात देवानंद मुख्य भूमिकेत होते आणि त्यांच्या मुलीची भूमिका तब्बूने साकारली होती. आज तब्बूचे असे अनेक चित्रपट आहेत जे बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले आहेत.

अभिनयाच्या जोरावर अनेकांच्या मनात घर करणाऱ्या तब्बूने अद्याप विवाह केलेला नाही. मात्र एकेकाळी तब्बूच्या अफेरच्या चर्चा रंगल्या होत्या. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून दाक्षिणात्य सुपरस्टार अक्कीनेनी नागार्जुन असल्याचे म्हटले जात होते. नागार्जुन आणि तब्बू यांनी बराच काळ एकमेकांना डेट केले असल्याच्या चर्चा सुरु होत्या.

 

View this post on Instagram

 

A very good morning from Tirumala!!blessed!! #Nagarjuna

A post shared by Nagarjuna (@akkineni__nagarjuna) on

एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान नागार्जुन आणि तब्बूची ओळख झाली होती. दरम्यान दोघे ही ऐकमेकांच्या प्रेमात पडले. नागार्जुन आणि तब्बूचे रिलेशनशीप जवळजवळ १० वर्षे सुरु असल्याचे म्हटले जात आहे. पण त्यावेळी नागार्जुन विवाहित होता. त्याने तब्बूला स्वत:च्या घराजवळ घर घेऊन दिले असल्याचे म्हटले जाते. नागार्जुनला तब्बूसोबतचे रिलेशन कायम ठेवायचे होते आणि पत्नीला घटस्फोटही द्यायचा नव्हता. मात्र तब्बूला हे मान्य नव्हते. काही दिवसांमध्ये दोघांच्या रिलेशनशीपमध्ये दुरावा निर्माण झाल्याचे म्हटले जाते. त्यानंतर तब्बूने नागर्जुनमुळे लग्नच केले नाही अशा चर्चा सुरु झाल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2020 10:14 am

Web Title: birthday special tabu was in reltionship with nagarjuna avb 95
Next Stories
1 चित्रपट महामंडळाला बदनाम करणाऱ्यांवर लवकरच कारवाई
2 ‘त्या’ तिघी सध्या काय करताहेत..?
3 ‘जान कुमारनं मराठीतून माफी मागायला हवी’; अर्शी खानने व्यक्त केला संताप
Just Now!
X