27 September 2020

News Flash

मराठी कलाकारांची खिल्ली उडवल्याने भाजपा प्रवक्ते अवधूत वाघ झाले ट्रोल

तर काही यूजर्सने त्यांना पाठिंबा दिला आहे.

भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी सोशल मीडियावर एका पोस्टवर कमेंट करत मराठी कलाकारांची खिल्ली उडवली आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही यूजर्सने त्यांना सुनावले आहे तर काहींनी त्यांना पाठींबा दिला आहे.

वाघ यांनी सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतशी संबंधीत एका पोस्टवर कमेंट करत मराठी कलाकारांची खिल्ली उडवली आहे. या पोस्टमध्ये कंगना एखादा चित्रपट किंवा जाहिरातींसाठी घेत असलेले मानधन आणि मराठी अभिनेत्री एका चित्रपटासाठी व मालिकेसाठी घेत असलेल्या मानधनातील फरक आधोरेखीत करण्यात आला आहे.

या पोस्टवर प्रवक्ते अवधूत वाघ यांनी मराठी कलाकारांना उद्देशून कमेंट केली आहे. या कमेंटमध्ये त्यांनी ‘स्कूटी घेतली की सेल्फी काढतात आणि डोंबिवली चर्चगेटचा फर्स्ट क्लासचा पास स्टेटस ठेवतात’ असे म्हटले आहे. त्यांच्या या कमेंटमुळे त्यांना सोशल मीडियावर काहींनी ट्रोल केले आहे तर काहींनी त्यांना पाठिंबा दिला आहे.

युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी अवधूत वाघ यांच्या कमेंटचा स्क्रीनशॉट शेअर करत ही अतिशय निंदनीय बाब आहे असे म्हटले आहे. ‘मराठी कलाकारांबद्दल असे वक्तव्य करणारे हे भाजप अधिकृत प्रवक्ते आहेत! अतिशय निंदनीय बाब आहे! मतांच्या लालसेपायी हे किती महाराष्ट्र द्रोही होणार ??? मराठी कलाकारांवर इतका राग का तर त्यांनी मुंबईवर अभिमान व प्रेम व्यक्त केले.. हे भाजप ला का झोम्बले ?’ असे त्यांनी म्हटले आहे.

वाघ यांनी कमेंट केली काय होती पोस्ट?

एका यूजरने ट्विटरवर कंगनाचे मानधन आणि मराठी कलाकारांचे मानधन अधोरेखीत केले होते. “इथे कोणालाही कमी लेखण्याचा प्रयत्न नाहीये. पण आज ज्या पद्धतीने मराठी नट्या कंगनावर तुटून पडल्यात आणि तिला तिची लायकी सांगतायत… सर्वांच्या माहितीसाठी.. कंगनाची फी-११ कोटी (मुव्हीसाठी)\ १.५ कोटी (अॅडसाठी), मराठी नट्या- २.५ ते ५ लाख (मुव्हीसाठी)\ ७.५ ते १०,००० रुपये पर डे सीरियलसाठी” असे ट्विटमध्ये म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2020 9:53 am

Web Title: bjp spokesperson slamis marathi artists avb 95
Next Stories
1 हिमानी शिवपुरी यांना करोनाची लागण, सोशल मीडिया पोस्टद्वारे केली विनंती
2 लग्नाआधीच महिमा होती प्रेग्नंट; या उद्योगपतीसोबत होतं अफेअर
3 चेहऱ्यावरून ६७ काचांचे तुकडे काढले; महिमा चौधरीने सांगितल्या त्या भीषण अपघाताच्या आठवणी
Just Now!
X