25 October 2020

News Flash

कारागृहात असताना सलमानने ‘त्या’ चिमुकल्याची इच्छा केली पूर्ण

काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरवलं आणि गुरुवारी त्याची कारागृहात रवानगी झाली होती. कारागृहात असताना सलमानने एका चिमुकल्याची इच्छा पूर्ण

सलमान खान

काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरवलं आणि आज (शनिवार) त्याला जामीनही मंजूर झाला. सलमानने कारागृहात दोन रात्र घालवल्यानंतर अखेर त्याची सुटका झाली. मात्र, कारागृहात असतानाही त्याच्या स्टारडममध्ये कोणताच फरक पडला नाही असं म्हणावं लागेल. कारण, कारागृहातही त्याची फॅन फॉलोईंग पाहायला मिळाली. यादरम्यान, बॉलिवूडच्या ‘भाईजान’ने एका चिमुकल्याची इच्छासुद्धा पूर्ण केली आहे.

हा चिमुकला होता, एका कारागृह कर्मचाऱ्याचा मुलगा. सलमानचा चाहता असल्याने त्या मुलाने ऑटोग्राफ देण्याची विनंती भाईजानकडे केली. ‘लव्ह सलमान खान’ लिहित त्याने त्या मुलाची इच्छा पूर्ण केली. इतकंच नाही तर काही कारागृह कर्मचाऱ्यांनीदेखील त्याचा ऑटोग्राफ घेतल्याचं म्हटलं जात आहे.

वाचा : काळवीट शिकारीसाठी ‘त्या’ दोघींनी सलमानला प्रवृत्त केलं; प्रत्यक्षदर्शीचा दावा

दरम्यान जोधपूर सत्र न्यायालयाने सलमानला ५० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर करताना कोर्टाने सलमानसमोर दोन अटी घातल्या आहेत. एक म्हणजे त्याला ७ मे रोजी कोर्टात यावं लागेल आणि दुसरं म्हणजे देश सोडण्यापूर्वी सलमानला कोर्टाची परवानगी घ्यावी लागेल.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2018 6:00 pm

Web Title: blackbuck poaching case salman khan obliges fan with autograph even inside prison
Next Stories
1 सलमानला जामीन मंजूर होताच ‘गॅलेक्सी’बाहेर चाहत्यांकडून जल्लोष
2 ते ट्विट मीच केले होते; शिवीगाळ प्रकरणानंतर कपिलची कबुली
3 World Health Day: जागतिक आरोग्य दिनानिमित्त चाहत्यांसाठी ऋताचा मोलाचा संदेश
Just Now!
X