News Flash

कंगनाची टिवटिव थांबणार; जाहीर केला मोठा निर्णय

ट्विटरमुळे कंगना अनेक वादात सापडली आहे

Kangana ranaut
संग्रहित छायाचित्र

ट्विटरच्या माध्यमातून अभिनेत्री कंगना रणौत नेहमी रोखठोक मतं मांडत असते. मात्र यामुळे अनेकदा मोठे वाद निर्माण झाले असून तिला टीकेचाही सामना करावा लागला आहे. ट्विरवर कंगनाकडून वापरण्यात येणाऱ्या भाषेवरही अनेकदा ट्विटरकर आक्षेप घेत असतात. फक्त सर्वसामान्याच नाही तर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी कंगनावर टीका करत असतात. नियमांचं उल्लंघन केल्याने कंगनाच्या अनेक ट्विट्सवर कारवाईदेखील झाली आहे. त्यातच आता कंगनाने मोठा निर्णय घेतला आहे.

कंगनाने ट्विट करत आपण ट्विटर सोडणार असल्याचं जाहीर केलं आहे. ट्विटर आता तुझी वेळ संपली आहे म्हणत कंगनाने koo app वर शिफ्ट होणार असल्याची माहिती ट्विट करत दिली आहे.

ट्विटरसोबत वादाचा फायदा, Koo App डाउनलोड करणाऱ्यांचा आकडा 10 लाखांपार

कंगनाने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “ट्विटर आता तुझी वेळ संपली असून #kooapp वर शिफ्ट होण्याची वेळ आली आहे. लवकरच यासंबंधीची माहिती सर्वांना देईल. आपल्याकडेच तयार करण्यात आलेल्या koo app चा अनुभव घेण्यास उत्सुक आहे”.

काय आहे Koo अ‍ॅप?
Koo अ‍ॅप आत्मनिर्भर भारत अ‍ॅप्लिकेशन चॅलेंजमध्ये सहभाग घेतला होता. Koo चा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातही केला होता. Koo अ‍ॅपवर भारतीय भाषांमध्ये ट्विटरप्रमाणे माइक्रोब्लॉगिंगचा अनुभव मिळतो. सोप्या शब्दात सांगायचं तर Koo म्हणजे ‘मेड इन इंडिया’ ट्विटर आहे. हिंदी, इंग्रजी, मराठीसह आठ भारतीय भाषांचा सपोर्ट या अ‍ॅपमध्ये आहे. Koo चा वापर अ‍ॅपसोबतच वेबसाइटवरुनही करता येतो. याचा इंटरफेस ट्विटरप्रमाणेच असून शब्दांची मर्यादा 350 आहे. ट्विटरप्रमाणेच Koo वर युजर्सना फॉलो करण्याचा पर्याय आहे. Koo वर भारतीय भाषांमध्ये विचार व्यक्त करण्याची सोय आहे.

रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याशिवाय अन्य काही मंत्र्यांनीही Koo अ‍ॅपवर अकाउंट क्रिएट केल्याचं समजतंय. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद, कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा हे देखील Koo वर आहेत. याशिवाय, विविध सरकारी मंत्रालये आणि विभागांची खातीही आहेत. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालय, माय गाव, डिजिटल इंडिया, इंडिया पोस्ट, नॅशनल इन्फॉर्मेटिव्ह सेंटर (NIC), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅन्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉमन सर्व्हिस सेंटर, उमंग अ‍ॅप, डिजी लॉकर, नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क विभागाच्या हँडल्सचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 11, 2021 4:34 pm

Web Title: bollywood actess kangana ranaut to shift on koo app from twitter sgy 87
Next Stories
1 प्राजक्ताचा सफरनामा;तिबेटीयन थाळीवर मारला ताव
2 Video: बॉलिवूड अभिनेत्रीने रस्त्यावर चालवली चक्क ई-रिक्षा
3 लवकरच उलगडणार ‘राजकुमार’ची प्रेमकथा; प्रवीण तरडे महत्त्वपूर्ण भूमिकेत
Just Now!
X