सरत्या वर्षाला निरोप देत नवी आव्हानं पेलत सर्वांनीच २०१८ चे मोठ्या उत्साहात स्वागत केले. यामध्ये कलाकार मंडळीही मागे राहिले नाहीत. अमिताभ बच्चन, शाहरुख खान यांच्यामागोमाग खिलाडी कुमारनेही सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अक्षयने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत आपण २०१७ तून थेट २०१८ मध्ये झेप घेत आहोत, असे कॅप्शन दिले. या व्हिडिओमध्ये तो एक स्टंट करताना दिसत असून, एका खांबावर झुलत असतानाच लगेचच दुसऱ्या खांबावर झेप घेताना दिसतोय. येणारे वर्ष सर्वांसाठी प्रगतीचे जावो आणि सर्वांच्या मनी असणाऱ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात असे म्हणत त्याने या खास दिवसाला आणखी महत्त्वं देऊ केले.
स्टंटबाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या खिलाडी कुमारचा हा व्हिडिओ सध्या चाहत्यांमध्येही बराच चर्चेत असून त्याची ही महत्त्वाकांक्षी झेप अनेकांची मनं जिंकून गेली आहे. आपल्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून काही अक्षय काही दिवसांपूर्वी सुट्टीवर गेला होता. येत्या काळात तो ‘पॅडमॅन’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या चित्रपटातील त्याच्या भूमिकेविषयी कुतूहलाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
वाचा : गरोदरपणाविषयी विद्या काय म्हणतेय ऐकलं का?