News Flash

अभिनेता नील नितीन मुकेशच्या घरी बाप्पाचं आगमन

नीलने शेअर केला बाप्पासोबतचा फोटो

सध्या देशावर करोना विषाणूचं सावट आहे. त्यामुळे सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण हा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करत आहे. आज हरतालिका असून उद्या प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत. परंतु, अनेक जण आदल्या दिवशीच बाप्पाची मुर्ती आपल्या घरी आणतात. यामध्येच अभिनेता नील नितीन मुकेश याच्या घरीदेखील बाप्पाचं आगमन झालं आहे.

नीलने इन्स्टाग्रामवर बाप्पासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये बाप्पा घरी आल्याचा आनंद नीलच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत आहे. हा फोटो शेअर करत ‘गणपती बाप्पा मोरया’, असं कॅप्शन त्याने दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

GANPATI BAPPA MORYA.

A post shared by Neil Nitin Mukesh (@neilnitinmukesh) on

दरम्यान, गणपती बाप्पा येणार असल्यामुळे सर्वत्र आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. यंदा देशावर करोनाचं सावट असल्यामुळे प्रत्येक सण, उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. मात्र तरीदेखील गणेशभक्तांच्या चेहऱ्यावर दरवर्षीप्रमाणे आनंद दिसून येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2020 2:15 pm

Web Title: bollywood actor neil nitin mukesh bring ganpati home ssj 93
टॅग : Ganeshotsav
Next Stories
1 ‘सुशांत प्रकरणी कळली सोशल मीडियाची ताकद’; कंगना रणौतची ट्विटरवर एण्ट्री
2 सुशांत-साराच्या अफेअरच्या चर्चांवर बोलताना कंगना म्हणाली, ‘हृतिकवर माझे खरे…’
3 ‘यांच्यासाठी धमकी देणारे नॉर्मल आहेत’, असे म्हणत पूजा भट्ट संतापली
Just Now!
X