News Flash

प्रेयसी सान्याशी प्रतिक बब्बर झाला ‘जस्ट एन्गेज्ड’

शेअर केला साखरपुड्याचा फोटो

छाया सौजन्य- इंडिया डॉट कॉम

गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाच्या वर्षीही कलाविश्वात बरीच कलाकार मंडळी विवाहबंधनात अडकण्याच्या मार्गावर आहेत असे म्हणायला हरकत नाही. २०१८ च्या सुरुवातीलाच मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत सेलिब्रिटींच्या लग्नाचे वारे वाहायला लागले असून अभिनेता प्रतिक बब्बरसुद्धा आता या वातावरणात सहभागी झाला आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण, सोमवारी प्रतिक आणि त्याची प्रेयसी सान्या सागरचा साखरपुडा झाला असून, खुद्द प्रतीकनेच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ‘होली स्नॅप… दॅट जस्ट हॅपण्ड’ असे कॅप्शन देत सान्यासोबतचा कँडिड फोटो पोस्ट केला.

साधारण वर्षभरापासून प्रतिक आणि सान्या एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच त्यांच्या रिलेशनशिपविषयीची माहिती समोर आली. आता तर या दोघांच्याही नात्यावर ‘इट्स ऑफिशिअल’ असा शिक्का लागला आहे, असेच म्हणावे लागेल. वसंत पंचमीच्या शुभमुहूर्तावर प्रतिक आणि सान्याचा साखरपुडा झाला. अतिशय खासगी सोहळ्यात आणि मोजक्या आप्तेष्ठांच्या उपस्थितीत हा साखरपुडा सान्याच्या लखनऊ येथील फार्महाऊसवर पार पडला.

सान्यासोबतच्या नात्याविषयी मुंबई मिररशी संवाद साधताना प्रतिक म्हणाला, ‘प्रेमाच्या नात्याची एका नव्या वळणावर सुरुवात करण्याचा निर्णय सान्या आणि मी आमच्या कुटुंबियांच्या साथीनेच घेतला होता. त्यासाठी वसंत पंचमीहून आणखी शुभ दिवस असूच शकत नव्हता. ती खूप चांगली असून, एक उत्तम सहचारिणी आहे. माझी साथ देणारी ती व्यक्ती म्हणजे सान्याच आहे हे ठरवण्यासाठी मला क्षणार्धाचाही वेळ लागला नव्हता. हे जरी रटाळ बोलणं वाटत असलं तरीही मी यासाठी देवाचे आभार मानेन तितके कमीच आहेत.’ प्रतिक आणि सान्याचा साखरपुडा झाला असला तरीही आपण लग्नासाठी फार घाई करणार नसल्याचे त्याने माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

कर्ता, कर्म आणि ‘करनी’

साखरपुडा आणि लग्नाच्या दरम्यानच्या काळाचा आम्हाला आनंद घ्यायचा आहे. त्यातही लखनऊ आणि मुंबई अशी सान्याची ये-जा सुरु असल्यामुळे आम्ही लगेचच विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेणार नाही. पण, तरीही लग्नाविषयीचे काही बेत मात्र माझ्या मनात आहेतच असेही प्रतिकने स्पष्ट केले. तेव्हा आता प्रतिकच्या लग्नाची बातमी कधी समोर येते याचीच चाहत्यांना प्रतिक्षा लागून राहिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2018 12:56 pm

Web Title: bollywood actor prateik babbar gets engaged to sanya sagar shares a candid picture from the ceremony
Next Stories
1 डार्विनच्या सिद्धांताचा आदिमानवांकडूनही निषेध; सत्यपाल सिंह यांना फरहानचा टोला
2 ..अखेर सिद्धार्थने मागितली माफी
3 ‘पद्मावत’मधील हे चार दमदार संवाद व्हायरल
Just Now!
X