05 July 2020

News Flash

रणवीरच्या मिठीतली ‘ती’ कोण?

रणवीर त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतो.

रणवीर सिंग

दिलखुलास आणि उत्साही व्यक्तीमत्वामुळे अभिनेता रणवीर सिंग चारचौघांमध्ये नेहमीच उठून दिसतो. ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा हा अभिनेता सध्याच्या घडीला तरुणींच्या गळ्यातील ताईत झाला आहे. बऱ्याच अभिनेत्यांची स्पर्धा असतानाही त्या स्पर्धेत तग धरुन आपला असा वेगळा चाहता वर्ग निर्माण करणात तो यशस्वी ठरला. रणवीरने फक्त त्याच्या व्यक्तीमत्वानेच नव्हे, तर त्याच्या अभिनयानेसुद्धा चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. त्याने साकारलेलील बाजीराव पेशव्यांची भूमिका असो किंवा क्रूर सुलतान अलाउद्दीन खिल्जीची भूमिका असो. प्रत्येक पात्राचं वेगळेपण जपत ते मोठ्या ताकदीने रुपेरी पडद्यावर सादर करण्याची कला रणवीरला अवगत आहे. असा हा ‘खुशमिजाज’ अभिनेता त्याच्या प्रेमप्रकरणांमुळे आणि खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतो.

सध्याच्याडी घडीला तो दीपिका पदुकोणसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण, दीपिका त्याच्या आयुष्यात येण्यापूर्वीही रणवीरचं नाव काही अभिनेत्रींशी जोडलं गेलं होतं. मुख्य म्हणजे चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी, महाविद्यालयीन दिवसांमध्येही या ‘बिट्टू शर्मा’ची म्हणजेच रणवीरची फॅन फॉलोइंग होती, असं म्हणायला हरकत नाही. सध्या सोशल मीडियावर रणवीरच्या फॅन पेजवरुन पोस्ट करण्यात आलेला फोटो पाहून हे लक्षात येत आहे.

पाहा : VIDEO: बर्लिनकरही म्हणाले ‘कुछ कुछ होता है’

पाहा : भितीदायक ‘परी’ची बहुविध रुपं 

‘रणवीर का फॅन क्लब’ या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट केलेल्या कृष्णधवल फोटोमध्ये रणवीरने एका मुलीला मिठी मारल्याचं दिसत आहे. आता रणवीरच्या मिठीतली ‘ती’ नेमकी आहे तरी कोण, हाच प्रश्न राहून राहून अनेकांच्या मनात घर करतोय. या फोटोमध्ये रणवीरचा ‘कूल डूड’ लूकही लक्ष वेधतोय. त्यामुळे लांब केस, कानात बाली, दाढी असा एकंदर रॉकस्टार लूक ठेवणाऱ्या रणवीरच्या महाविद्यालयीन दिवसांच्या आठवणींना उजाळा देतोय, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. तेव्हा आता हा फोटो रणवीरपर्यंत पोहोचला तर तो यावर कसा व्यक्त होणार आणि त्या मुलीविषयी काही उलगडा करणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2018 1:21 pm

Web Title: bollywood actor ranveer singh college days picture goes viral on internet he is hugging a female friend in this throwback photo
Next Stories
1 अशी साकारली थरकाप उडवणारी ‘परी’
2 अरिजीतच्या गाण्याबाबत झालेल्या त्या चर्चा अफवाच
3 दास्तान-ए-मधुबाला : भाग ७
Just Now!
X