‘ट्युबलाइट’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं आता जवळपास सर्वांनाच ठाऊक झालं आहे. पण, ज्यांच्यापर्यंत या चित्रपटाबद्दल फारशी माहिती पोहोचली नाहीये त्यांच्यासाठी थेट न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअर या जगप्रसिद्ध भागात ‘ट्युबलाइट’चे पोस्टर लावण्यात आले आहेत. सध्याच्या घडीला वापरलेली ही वेगवेगळी प्रसिद्धी तंत्र पाहता चित्रपट निर्मात्यांनी ‘ट्युबलाइट’च्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर शिल्लक ठेवली नाहीये असंच पाहायला मिळत आहे.

‘ट्युबलाइट’च्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन टाईम्स स्क्वेअरचा हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. या फोटोमध्ये एका गगनचुंबी इमारतीवर ट्युबलाइचा पोस्टर पाहायला मिळत असून, तो मोठ्या चतुराईने गर्दीच्या आणि दर्शनीय भागातच लावण्यात आला आहे. कबीर खान दिग्दर्शित हा चित्रपट आठ दिवसांनी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वीच बिहाइंड द सीन्स व्हिडिओ, चित्रपटातील गाणी आणि कलाकारांच्या भूमिकांबद्दलचे काही रंजक किस्से प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत सर्व काही ‘ट्युबलाइटमय’ करण्यासाठीच भाईजान आणि त्याची संपूर्ण टीम प्रयत्न करत आहे. ईदच्या निमित्ताने हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार असला तरीही पाकिस्तानमध्ये मात्र हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी प्रेक्षकांना वाट पाहावी लागणार आहे. अर्थात या चित्रपटाच्या प्रदर्शनात कोणताही अडथळा नाहीये. पण, फक्त पाकिस्तानी चित्रपटांच्या कमाईवर त्याचा परिणाम होऊ नये यासाठीच ट्युबलाइटची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्याची चिन्हं आहेत.

Dolly Chaiwala and Bill Gates
Dolly Chaiwala मायक्रोसॉफ्ट विंडोज १२चा ब्रँड अँबॅसेडर? जाणून घ्या सत्य
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा

वाचा : पोरगी पास होण्याचं सुख काय असतं ते भाऊ कदमला विचारा

दरम्यान, सध्या बॉलिवूड विश्वातही भाईजानच्या या चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. याच उत्साहपूर्ण वातावरणात या चित्रपटाचा डायलॉग प्रोमो लाँच करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये सलमान खान आणि बालकलाकार माटिनची झलक पाहायला मिळत आहे. साधाभोळा सलमान आणि निरागस माटिन पाहता या दोघांमध्ये असणारं नातं नेमकं कसं असणार आहे, हाच प्रश्न आता प्रेक्षकांच्या मनात घर करतोय. ‘ट्युबलाइट’ बऱ्याच अर्थांनी महत्त्वाचा चित्रपट ठरत आहे. त्यापैकीच एक कारण म्हणजे शाहरुख खानचा कॅमिओ. कबीर खानने बॉलिवूडच्या या दोन आघाडीच्या अभिनेत्यांना एकत्र आणण्याची किमया करत प्रेक्षकांना एक खास भेटच दिली आहे असं म्हणयला हरकत नाही.