News Flash

..असा दिसतो ‘सेजल’चा पंजाबी ‘हॅरी’

'हॅरी' आणि 'सेजल' तुमची भेट घेण्यासाठी कोणत्याही क्षणी येऊ शकतात

छाया सौजन्य- सोशल मीडिया

बॉलिवूडची ‘बब्ली गर्ल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री अनुष्का शर्माने तिच्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शाहरुखचा एक नवा लूक सर्वांसमोर आणला आहे. दिग्दर्शक इम्तियाज अलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अनुष्काने हा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये ती, शाहरुख आणि इम्तियाज एका बाईकवर बसल्याचं पाहायला मिळतंय. मुख्य म्हणजे या फोटोमध्ये इम्तियाजच्या चित्रपटातील ही पात्र अस्सल पंजाबी लूकमध्ये दिसत आहेत. ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटाच्या पंजाबमधील चित्रीकरणादरम्यानचे हे फोटो असल्याचं पाहताचक्षणी लक्षात येतंय.

काही दिवसांपूर्वी ‘जब हॅरी मेट…’च्या चित्रीकरणादरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोंमध्य शाहरुखचं पंजाबी रुप काही स्पष्टपणे पाहायला मिळालं नव्हतं. पण, अनुष्काने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये मात्र किंग खानचा ‘हार्ड कोर’ पंजाबी लूक सर्वांचीच मनं जिंकत आहे. त्याच्याप्रमाणेच अनुष्कासुद्धा गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये पंजाबी कुडीच्या सुरेख रुपात दिसत आहे.

अनुष्का आणि शाहरुख या चित्रपटाच्या निमित्ताने तिसऱ्यांदा स्र्कीन शेअर करणार आहे. याआधी ‘रब ने बनादी जोडी’, ‘जब तक है जान’ या दोन्ही चित्रपटांमध्ये शाहरुख आणि अनुष्काच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. त्यामुळे आता येत्या काळात त्यांची केमिस्ट्री पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सध्या ‘जब हॅरी….’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीवर जास्त लक्ष देण्यात येत असून काही खास बेतही आखण्यात येत आहेत. यामध्ये काही सेकंदांच्या व्हिडिओंच्या माध्यमातून चित्रपटातील महत्त्वाच्या पात्रांची ओळखही करुन देण्यात येणार आहे. त्यामुळे ‘हॅरी’ आणि ‘सेजल’ प्रेक्षकांची भेट घेण्यासाठी कोणत्याही क्षणी येऊ शकतात असंच म्हणावं लागेल.

वाचा : जाणून घ्या अनुराग कश्यपच्या २३ वर्षीय गर्लफ्रेंडविषयी…

‘जब हॅरी मेट सेजल’मध्ये शाहरूख एक पंजाबी गाइडची भूमिका साकारणार आहे. ज्याचे नाव हरविंदर सिंह नेहरा असे आहे. चित्रपटात त्याला सगळे ‘हॅरी’ या नावाने बोलावतात. तर अभिनेत्री अनुष्का गुजराती मुलगी ‘सेजल’ची भूमिका साकारणार आहे. ‘सेजल’ युरोपला फिरायला गेली असता ‘हॅरी’सोबत तिची ओळख होते आणि त्यानंतर दोघे कसे एकमेकांच्या प्रेमात पडतात याभोवतीच या चित्रपटाचं कथानक फिरणार असल्याचं म्हटलं जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2017 7:31 pm

Web Title: bollywood actress anushka sharma reveals shah rukh khans sikh look from imtiaz alis jab harry met sejal see photo
Next Stories
1 ‘युनिसेफ’ने घेतली ‘परफेक्ट डॅडी’ची दखल
2 आमिरला चित्रपटात दगा देणारा ‘तो’ झाला यशस्वी अभिनेता
3 अरुणभ कुमारचा ‘टीव्हीएफ’च्या सीईओपदाचा राजीनामा
Just Now!
X