बॉलिवूडमध्ये कलाकार मंडळी त्यांच्या चित्रपटांसोबतच इतरही बऱ्याच कारणांमुळे चर्चेत असतात. अभिनेत्री राधिका आपटेसुद्धा सध्या अशाच एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये राधिकाने अनेक विषयांवर तिची मतं मांडत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. मुख्य म्हणजे या कार्यक्रमात तिने सलमान खानने लाँच केलेल्या अभिनेता सूरज पांचेलीने त्याच्या शरीरयष्टीवर जास्त लक्ष देण्यापेक्षा अभिनय कौशल्यावर लक्ष केंद्रित करावं असा सल्ला दिला आहे.
राधिकाच्या या वक्तव्यानंतर आत आपल्या आवडत्या अशा सूरज पांचोलीची बाजू घेत सलमान काय प्रतिक्रिया देणार, याकडेच अनेकांचं लक्ष लागून राहिलं आहे. सूरजशिवाय राम गोपाल वर्माविषयीसुद्धा तिने एक वक्तव्य केलं. राम गोपाल वर्माने आता चित्रपट दिग्दर्शन क्षेत्रातून निवृत्त व्हावं, असं ती या चॅट शोमध्ये म्हणाली. नेहा धुपियासोबत ‘बीएफएफ विथ वोग’ या चॅट शोमध्ये गप्पा मारतेवेळी राधिकाने तिच्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टींचासुद्धा उलगडा केला.
वाचा : इन्स्टाग्राम पोस्टमधून प्रिया वारियरची जबरदस्त कमाई
तामिळ चित्रपटसृष्टीत काम करतेवेळीच्या एका प्रसंगाविषयीसुद्धा तिने या चॅट शोमध्ये सांगितलं. ज्यावेळी तिने एका प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याच्या कानशिलात लगावली होती. पहिल्याच दिवशी चित्रपटाच्या सेटवर गेली असता त्या अभिनेत्याने राधिकाच्या पायावर गुदगुल्या करण्यास सुरुवात केली. ही त्यांची पहिली भेट असल्यामुळे एखादी व्यक्ती अशी कशी वागू शकते याच विचाराने तिच्या मनात काहूर माजवला आणि तिने कोणताही क्षणाचाही विलंब न करता त्या अभिनेत्याच्या कानशिलात लगावली होती. राधिकाने सांगितलेल्या या प्रसंगानंतर तो अभिनेता नेमका कोण आणि कोणत्या चित्रपटाच्या वेळी हा प्रसंग घडला होता, हा प्रश्न चाहत्यांच्या मनात घर करुन गेला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 16, 2018 11:19 am