04 March 2021

News Flash

‘वंडर वुमन’च्या सिक्वलमध्ये झळकणार ही बॉलिवूड अभिनेत्री

माझं स्वप्न खऱ्या अर्थानं प्रत्यक्षात उतरलं आहे अशी प्रतिक्रिया तिनं दिली आहे. 'वंडर वुमन १९८४' हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित होत आहे.

वंडर वुमन- गल गडॉट

‘वंडर वुमन’ अर्थात गल गडॉटसोबत काम करण्याची मोठी संधी बॉलिवूड अभिनेत्रीच्या वाट्याला आहे. ‘रांची डायरीज’ या चित्रपटातून झळकलेल्या सौंदर्या शर्माच्या वाट्याला ही मोठी संधी चालून आली आहे. डीसीच्या ‘वंडर वुमन १९८४’ या चित्रपटाचा सौंदर्या भाग असणार आहे. सौंदर्यानं अधिकृतरित्या याची माहिती दिली आहे.

माझं स्वप्न खऱ्या अर्थानं प्रत्यक्षात उतरलं आहे. या चित्रपटात काम करणं हे माझं स्वप्न होतं. गलचे चित्रपट पाहून अशा चित्रपटात काम करण्याची संधी कधीतरी मलादेखील मिळावी याचा विचार मी करायचे आता हे स्वप्न खरं ठरलं आहे असं सौंदर्या म्हणाली.

‘वंडर वुमन १९८४’ चित्रपटात सौंदर्या कोणती भूमिका साकारणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे. ऑक्टोबरपासून या चित्रपटाच्या चित्रिकरणास सुरूवात होणार आहे. २०१९ मध्ये या चित्रपटाच सिक्वल येणार आहे. या सिनेमात गलचा नवा अंदाजही दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी गलनं आपल्या नव्या लूकचा फोटो शेअर केला होता. वयाच्या १८व्या वर्षी ‘मिस इस्राईल’चा किताब पटकावणारी गल ‘वंडर वुमन’ या बहुचर्चित चित्रपटातून प्रसिद्धीस आली. अल्पावधीत वंडर वुमनमधील सूपरवुमनच्या भुमिकेमुळे गल जगभरात प्रसिद्ध झाली, गलचे जगभरात कोट्यवधी चाहते आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2018 4:55 pm

Web Title: bollywood actress soundarya sharma bags role in wonder woman 1984
Next Stories
1 सलमानची संपत्ती आहे तरी किती? वाचा
2 पहिल्यांदाच ‘कपल’ म्हणून समोर येणार रणबीर- आलिया
3 ‘या’ अभिनेत्यासाठी झाला मणिकर्णिकाच्या स्क्रिप्टमध्ये बदल
Just Now!
X