सहलीतील गाणी हा देखिल आपल्याकडील चित्रपट गीत-संगीत-नृत्यातील मस्त प्रकार आहे. एक प्रकारचा तो आनंदोत्सवच जणू! आणि त्याच पिकनिक मूडमध्ये नायक गाण्यातून नायिकेची मनमुराद छेडछाड करतोय,

ओ मनचली, कहाँ चली
देख देख देख देख मुझ से न शरमा
एक एक एक मैं हूँ भंवरा
और तू कली, ओ मनचली …

पटकन उत्साही संजीवकुमार लीना चंदावरकरची मनसोक्त छेडछाड करतोय हे आठवलं ना? राजा नवाथे दिग्दर्शित ‘मनचली’ (१९७३) मधील हा सगळाच धमाल प्रकार आहे. सगळी पिकनिक नाचगाण्यात छान रमलीय आणि त्यात संजीवकुमार लीनाचा अजिबात पिच्छा सोडत नाही. दोघांनीही वेगळ्या प्रकारची टोपी घातल्याने त्यांचे रुपडे अधिकच खुललयं.

होठों पे लेके तेरा नाम
आई है रंग भरी शाम
फूलों से छलके हैं जाम
भंवरों ने दिल लिये थाम
ऐसे में, हे हे हो ए हे हो
ऐसे में, तोड़ के प्रेम की डोरी
ओ गोरी, चकोरी, तू कहाँ चली …

हा सगळाच एका गार्डनमधील उपद्व्याप असल्याने झाड-फुलांचा जेवढा म्हणून वापर करता येईल तेवढा केलाय. या छेडछाड वा मस्तीत एक प्रकारे इम्प्रेशन मारून नायिकेला आपलसं करण्याचाही प्रयत्न नायक करतोय. लीनाने मात्र आपल्या चेहर्याीवरची चीड जराही कुठे कमी होऊ दिलेली नाही. तर पिकनिकमधील सगळेच सहकारी या गाण्यात कोरसमध्ये गात नायकला प्रोत्साहन देताहेत. संजीवकुमार त्यामुळेच अधिकच मोकळेपणाने वावरतोय आणि गातोय.

दुनिया से नहीं डरेंगे
हम तुम मुलाक़ाते करेंगे
आजा दो बाते करेंगे
रंगीं बरसातें करेंगे
ये सच है ए हे ओ ओ ए हे ओ ओ
ये सच है मैं हूँ एक दीवाना
न जाना, न माना, तू कहाँ चली …

किशोरकुमार अशा मोकळ्या ढाकळ्या गाण्यात नेहमीच बेभान गायचा. तो एकूणच गाण्याचा मूड खुलवायचा. आनंद बक्षीचे गीत व लक्ष्मीकांत- प्यारेलाल यांचे संगीत यांच्या अनेक सुपर हिट गाण्यातील हे एक आहे. संजीवकुमार अनेकदा तरी आपल्या प्रत्यक्ष वयापेक्षाही मोठ्याच वयाच्या व्यक्तिरेखा साकारे. त्याची ही तरुण भूमिका व यंग मस्तीचे गाणे.

रुत ऐसी आई हुई है
बदली सी छाई हुई है
तू क्यों शरमाई हुई है
मुझसे घबराई हुई है
प्यार में ए हे ओ ओ ए हे ओ ओ
प्यार में यार से आँख चुराके
छुपाके, बचाके, तू कहाँ चली …

किशोरकुमारचे अधूनमधून ‘ है…है…ओ ‘ गाण्यात रंग भरते आणि संजीवकुमार हा मूड छानच पकडतो. लीना चंदावरकर त्याच्या तावडीतून सुटण्याचा सतत प्रयत्न करते. मौज, मजा, मस्ती आणि म्युझिक असे हे छान जमून आलेले गाणे आहे.
दिलीप ठाकूर