बॉलिवूडमध्ये अतिशय लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक असणारे अभिनेते म्हणजे अनिल कपूर. ते अभिनयासोबतच फिटनेसाठी देखील ओळखले जातात. अलीकडेच अनिल कपूर यांचे भाऊ बोनी कपूर यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमुळे अनिल कपूर सध्या चर्चेत आहेत.

बोनी कपूर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर फोटो शेअर केला आहे. त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये बोनी कपूर, अनिल कपूर आणि सुनील कपूर हे तिघे भाऊ दिसत आहेत. हा फोटो त्यांच्या बालपणीचा आहे. या फोटोंमध्ये त्या तिघांना ओळखणे देखील कठिण झाले आहे. सध्या सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाला आहे.

Video : अनिल कपूर यांचा आलिशान बंगला पाहा आतून

हा फोटो शेअर करत बोनी कपूर यांनी “#ChildhoodMemories चुलत भाऊ टोनी (सुनील कपूर)चा वाढदिवस साजरा करताना. मी टोनीच्या बाजूला जेवणाचा आनंद घेत असून अनिल उजव्या बाजूला कॅमेरासाठी पोज देत आहे” अशा आशयाचे कॅप्शन बोनी कपूर यांनी दिल आहे. या फोटोमध्ये अनिल कपूर यांना पाहून ते लहानपणा पासून फोटोजेनिक असल्याचे दिसून येत आहे.

सध्या अनिल कपूर त्यांचा आगामी चित्रपट ‘जुग जुग जिओ’च्या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात नीतू कपूरसुद्धा त्याच्यासोबत दिसणार आहे. लवकरच अनिल कपूर करण जोहरच्या ‘तख्त’ चित्रपटात देखील दिसणार आहेत. तर, बोनी कपूर यांचा पुढील चित्रपट ‘मैदान’ पुढील वर्षी प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.