‘ब्रीद’ या वेब सीरिजचा दुसरा सिझन ‘ब्रीद : इन्टू द शॅडो’ हा नुकताच अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या वेब सीरिजला प्रेक्षक व समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या कलाकारांच्या संपत्तीबद्दल जाणून घेऊयात..

अभिषेक बच्चन – अभिषेकने ‘ब्रीद २’मध्ये अविनाश सबरवालची भूमिका साकारली आहे. ‘रिपब्लिक वर्ल्ड’ने दिलेल्या माहितीनुसार, अभिषेकची एकूण संपत्ती सुमारे २१३ कोटींच्या घरात आहे.

अमित साध – अमितने ‘फूंक २’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अमितने छोट्या पडद्यावरून त्याच्या करिअरची सुरुवात केली. ‘ब्रीद २’मध्ये त्याने कबीर सावंतची भूमिका साकारली आहे. अमित साधची एकूण संपत्ती सात कोटी इतकी आहे.

https://www.instagram.com/p/CC7vR03pxUK/

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नित्या मेनन- दाक्षिणात्य चित्रपटांमधील लोकप्रिय अभिनेत्री नित्या मेननने या सीरिजमध्ये आभा सबरवालची भूमिका साकारली आहे. नित्या मेननची एकूण संपत्ती १५ कोटी इतकी आहे.