News Flash

VIDEO : ‘धकधक गर्ल’ नव्हे, ही तर ‘स्वप्नांनी रंगणारी परी’

ज्या अभिनेत्रीची एकदा तरी भेट घेण्याची अनेकांचीच इच्छा आहे, त्याच अभिनेत्रीसोबत सुमितला स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाल्यामुळे तोसुद्धा या चित्रपटासाठी फारच उत्सुक होता.

बकेट लिस्ट

‘…इंतजार आजा पिया आयी बहार’ असं म्हणत ठेका धरणारी माधुरी दीक्षित प्रेक्षकांच्या मनातून उतरत नाही तोच तिचं आणखी एक रुप सर्वांच्याच मनाचा ठाव घेण्यासाठी सज्ज झालं आहे. हिंदी चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ही ‘धकधक गर्ल’, ‘बकेट लिस्ट’ या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटात पदार्पण करत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर आणि त्यातील एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. ज्यामागोमाग या सौंदर्यवतीच्या मोहक अदा असणारं आणखी एक गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.

‘तू परी’, असे बोल असणाऱ्या या गाण्यातून माधुरी आणि अभिनेता सुमित राघवन यांच्यातील ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. ज्या अभिनेत्रीची एकदा तरी भेट घेण्याची अनेकांचीच इच्छा आहे, त्याच अभिनेत्रीसोबत सुमितला स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाल्यामुळे तोसुद्धा या चित्रपटासाठी फारच उत्सुक असल्याचं त्याने एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं. दरम्यान चिरतरुण अभिनेता सुमित राघवन आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्यावर चित्रीत करण्यात आलेलं बकेट लिस्टमधील ‘तू परी’ हे गाणं माधुरीच्या ५१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला आलं आणि त्यांचच होऊन गेलं, असं म्हणायला हरकत नाही.

वाचा : HBD Madhuri BLOG : माधुरी… मराठी मनाचा सांस्कृतिक अभिमान

‘प्रेमाची व्याख्या पुन्हा नव्याने मांडण्यासाठी हे गाणं तुमच्या भेटीला आलं आहे…’, असं ट्विट करत खुद्द करण जोहरने या गाण्याचा व्हिडिओ ट्विट केला. श्रेया घोषाल आणि रोहन प्रधान यांनी गायलेल्या या गाण्यातून आपल्या समोर येणारी माधुरी पुन्हा एकदा तिच्या रुपाची जादू करुन जातेय असं म्हणायला हरकत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2018 11:37 am

Web Title: bucket list marathi movie song tu pari actress madhuri dixit nene and sumeet raghvans love ballad is sure to strike a chord with your heart
Next Stories
1 परफेक्शनिस्ट आमिरला बिग बींनी दिला कानमंत्र!
2 TOP 5 : नववधू प्रिया मी बावरते, कानच्या रेड कार्पेटवर सोनमचा ‘खुबसूरत’ अंदाज
3 भाजपच्या ‘शंभर नंबरी’ यशानंतर प्रकाश राज नेटकऱ्यांच्या निशाण्यावर
Just Now!
X