News Flash

हिंदी सिनेमांची अश्लील गाणी सुधारण्याची मोहीम

या गाण्यांमुळे मुलींना वेगवेगळ्या नावाने चिडवण्याचे प्रकार सर्रास सुरु असल्याचे मुलांनी नोंदविले.

महिलांविषयक दृष्टिकोन बदलण्यासाठी मुंबईतील १२० महाविद्यालयांचा पुढाकार

मुन्नी बदनाम हुई, शीला की जवानी यासारखी आक्षेपार्ह शब्दरचना असलेली हिंदी सिनेमातली अश्लील गाणी महाविद्यालयातीलच तरूणाईच्या मदतीने सुधारण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. अश्लील गाणे खटकत असल्यास तर ते नव्याने रचण्याच्या ‘पेन उठावो, गाना घुमावो’ नामक या भन्नाट स्पर्धेच्या माध्यमातून महिलांविषयीच्या सनातन दृष्टीकोनात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न आहे.

चीज, माल, सेक्सी यासारख्या आक्षेपार्ह शब्दांनी स्त्रीला संबोधल्या जाणाऱ्याहिंदी सिनेमांमधील गाण्यांमुळे समाजात स्त्रियांविषयी चुकीचा संदेश पसरविला जातो. अश्लील गाणी स्त्रियांच्या लंगिक शोषणाला दुजोरा देतात. तेव्हा अशा गाण्यांबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे, हे जाणून ‘अक्षरा’ या संस्थेने या स्पध्रेचे आयोजन केले आहे. ‘सुरुवातीला काही महाविद्यालयीन मुलांसोबत कार्यशाळांच्या माध्यमातून अश्लील गाण्यांमधून खटकणाऱ्या गोष्टी जाणून घेतल्या. मुले गाणी म्हणून चिडवतात, पाठलाग करतात. त्यावेळी त्यांना उलटून काही बोलले तर आम्ही फक्त गाणे म्हणतोय, असे सांगतात. अशावेळी काय करावे हे कळत नाही,’ अशा प्रतिक्रिया मुलींनी दिल्या.

या गाण्यांमुळे मुलींना वेगवेगळ्या नावाने चिडवण्याचे प्रकार सर्रास सुरु असल्याचे मुलांनी नोंदविले. यातूनच अश्लील गाण्यांचे शब्द बदलून नव्याने रचना करण्याची संकल्पना सुचली,’ अशी माहिती संस्थेच्या स्नेहल वेलकर यांनी दिली.

अक्षराची ही मोहीम मुंबईतील जवळपास १२० महाविद्यालयांपर्यंत पोहोचली आहे. सोशल मिडियावर स्पध्रेचा #BollywoodCanChange असा हॅशटॅगही अगदी झपाटय़ाने पसरला आहे. ही स्पर्धा राज्यस्तरीय असून दिल्ली, बंगळुरू अशा विविध राज्यांमधील सामाजिक संस्थाही यात सहभागी झाल्या आहेत. या स्पध्रेमुळे लगेचच कोणता बदल होणार नाही. परंतु अश्लील गाणी, त्यांचे परिणाम या विषयावर चर्चा घडाव्या, नागरिकांनी आपले विचार मांडावेत यासाठी अधिकाधिक लोकांनी यात सहभाग घ्यावा, असे आवाहन वेलकर यांनी केले आहे. स्पध्रेबाबत अधिक माहिती www.akshracentre.org <http://www.akshracentre.org/> या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुन्नीच्या गाण्यानंतर माझ्या ओळखीतल्या मुलीला ‘मुन्नी’ नावाने चिडवायला सुरुवात झाली. मला ते विशेष आवडले नाही. पण मग मी ही गोष्ट विसरलो. परंतु अक्षराच्या या स्पध्रेनिमित्ताने पुन्हा आठवले की, जेव्हा ‘मुन्नी डाìलग’ म्हणत असतील तेव्हा तिला काय वाटत असेल. म्हणून मी या स्पध्रेत भाग घेऊन एका अश्लील गाण्याची छाप पुसण्याचा निर्णय घेतला आहे.’

-सुयश जाधव, एस.आय.ई.एस महाविद्यालय

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2017 2:35 am

Web Title: campaign against vulgar hindi film songs
Next Stories
1 मुंबईसारखे सुरक्षित आमच्याकडेही वाटावे!
2 जानेवारी महिन्यात होणार या चित्रपटांचा ‘बोभाटा’..
3 सेलिब्रिटी क्रश : तो मला ‘भयंकर’ आवडायचा
Just Now!
X