वेगवेगळ्या भूमिकांमधून विशेषत: चरित्रात्मक भूमिकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणारा तसेच ‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक म्हणून नवी खेळी सुरु करणारा अभिनेता म्हणजे सुबोध भावे. नुकताच तो एका नव्या भूमिकेत आपणा सर्वांना पाहावयास मिळाला. सुबोधची ही भूमिका लेखकाची असून त्याने लिहिलेल्या ‘घेई छंद’ या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक सुबोध भावेची ओळख झाली.  ‘बालगंधर्व’ चित्रपटातून बालगंधर्वाच्या भूमिकेत त्याने अभिनयाची एक वेगळी उंची गाठली. ‘लोकमान्य टिळक’ चित्रपटातून तो एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांसमोर आला तर अगोदर ‘कटय़ार काळजात घुसली’ या नाटकातील भूमिका आणि नंतर याच नाटकावर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन व भूमिका अशी दुहेरी जबाबदारी त्याने यशस्वीपणे पार पाडली. असा हा हरहुन्नरी कलाकार सुबोध भावे सांगतोय त्याच्या क्रशबद्दल…..

पूजा भट्ट मला भयंकर आवडायची. पूजावर मला वाटतं माझं खूप काळ टिकलेलं क्रश होतं. त्या काळात मी तिला प्रेमपत्रही लिहली होती. घरामध्ये मी माझ्या वरच्या खोलीत तिचे फोटो लावले होते. त्यानंतर मी लपून तिच्यासाठी एक प्रेमपत्र लिहलं आणि ते पोस्टही केलं. मात्र, त्या प्रेमपत्राच काय झालं हे मला माहित नाही. तिच्यापर्यंत ते पोहचल की नाही किंवा ते तिला मिळालं आणि तिने ते फाडून टाकलं, याबाबत मला काहीच माहित नाही. पण ती मला भयंकर आवडायची, असे सुबोध म्हणाला.

आपल्या अभिनयाने रसिकप्रेक्षकांवर छाप पाडणा-या सुबोधची ही वेगळी बाजू या निमित्ताने आपल्याला कळली, असो. कधी एककेकाळी पूजा भट्टवर प्रचंड प्रेम करणा-या या कलाकारावर आज लाखो प्रेक्षक मनापासून प्रेम करतात हेकाही कमी नाही.