News Flash

‘या’ अभिनेत्रीच्या आईनेच केली वडिलांची हत्या

मुलाखतीत तिने हा गौप्यस्फोट केला.

‘फास्ट अॅण्ड फ्युरियस’ फेम अभिनेत्री शार्लीज थेरॉन हॉलिवूड सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. आपल्या अफलातून अभिनयाच्या जोरावर तुफान लोकप्रियता मिळवलेल्या या अभिनेत्रीने नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत आपल्या आईबद्दल एक गौप्यस्फोट केला आहे. आईने तिच्या वडिलांची गोळ्या झाडून हत्या केली होती.

 

View this post on Instagram

 

Catch me and my bionic hand talking all things #TheAddamsFamily tonight on @jimmykimmellive

A post shared by Charlize Theron (@charlizeafrica) on

CAA Protest : ‘ते’ ट्विट आलं फरहान अख्तरच्या अंगाशी, झाली पोलीस तक्रार

काय म्हणाली थेरॉन?

ही घटना १९९१ साली घडली होती. थेरॉन तेव्हा १५ वर्षांची होती. तिच्या आई-वडिलांमध्ये नेहमीच भांडणे होत असंत. त्या दिवशी दुपारी थेरॉन शाळेतून नुकतीच घरी आली होती. त्यावेळी तिचे वडिल दारुच्या नशेत आईला मारहाण करत होते. दरम्यान त्यांनी अचानक आपले पिस्तुल काढले व तिच्या आईवर गोळ्या झाडल्या. स्वत:ला वाचवण्यासाठी आईने हातात येतील त्या वस्तू वडिलांच्या दिशेने फेकल्या. दरम्यान त्यांच्या हातातील पिस्तुल खाली पडले. त्यानंतर पिस्तुल मिळवण्यासाठी दोघांमध्ये झटापट झाली. त्याचवेळी एक गोळी पिस्तूलातून सुटली व वडिलांना लागली. जखमी झालेले वडिल टेबल लँप घेऊन आईल मारायला गेले. त्याचवेळी आईने आणखी तीन गोळ्या झाडल्या. परिणामी वडिलांचा मृत्यू झाला. वडिलांची हत्या करण्याच्या आरोपाखाली थेरॉनच्या आईला अटक झाली. परंतु तिने स्वसंरक्षणार्थ गोळ्या झाडल्या होत्या. त्यामुळे तिला केवळ दोन वर्षांचा तुरुंगवास झाला.

CAA Protest : रजनीकांत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुलाखतीदरम्यान या घटनेचे वर्णन करताना शार्लीज थेरॉन भाऊक झाली होती. परंतु तिने आपल्या आईचे कौतुकदेखील केले. त्यांचे घर आईच्या पैशांवर चालत होते. वडील बेरोजगार होते आणि दारुच्या नशेत दररोज आईला मारहाण करत असे थेरॉन म्हणाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2019 1:26 pm

Web Title: charlize theron mother killed father mppg 94
Next Stories
1 CAA Protest : ‘ते’ ट्विट आलं फरहान अख्तरच्या अंगाशी, झाली पोलीस तक्रार
2 मराठी सिनेसृष्टीत ऐतिहासिक प्रयोग, आता येतोय केवळ एकच कलाकार असलेला चित्रपट
3 CAA Protest : रजनीकांत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
Just Now!
X