News Flash

‘चेन्नई एक्स्प्रेस’ निर्मात्याच्या मुलीला करोनाची लागण

आश्चर्याची बाब म्हणजे, शाजाला करोनाची लक्षणेच दिसली नव्हती.

'चेन्नई एक्स्प्रेस'

‘चेन्नई एक्स्प्रेस’ या सुपरहिट चित्रपटाचे निर्माते करिम मोरानी यांच्या मुलीला करोनाची लागण झाली आहे. शाजा मोरानी असं तिचं नाव असून मुंबईतल्या एका रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. शाजा मोरानीचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने कुटुंबातील सर्व व्यक्तींचे विलगीकरण करण्यात आले आहे. करिम हे शाहरुख खानचे जवळचे मित्र असून एका वेबसाइटला त्यांनी ही माहिती दिली. आश्चर्याची बाब म्हणजे, शाजाला करोनाची लक्षणेच दिसली नव्हती.

शाजाने ‘ऑलवेज कभी कभी’ आणि ‘हॅपी न्यू इअर’ या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शिकेचं काम केलं. तर करिम यांनी शाहरुखच्या बऱ्याच चित्रपटांची निर्मिती केली आहे. यामध्ये ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘दिलवाले’, ‘हॅपी न्यू इअर’ आणि ‘रा वन’ या चित्रपटांचा समावेश आहे.

देशभरात करोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. करोनाचा प्रसार अधिकाधिक होऊ नये म्हणून २१ दिवस लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. तर दररोज करोनाची चाचणी मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2020 9:46 am

Web Title: chennai express producer karim morani daughter shaza tests positive for covid 19 ssv 92
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ‘देख भाई देख’च्या चित्रीकरणादरम्यान अभिनेत्याच्या मुलाचा झाला होता मृत्यू, जाणून घ्या सविस्तर…
2 Video: १०० शतकांचा रेकॉर्ड कोण मोडणार? सलमानच्या प्रश्नावर सचिनने केली होती भविष्यवाणी
3 आईसाठी तैमूरने तयार केला खास नेकलेस, करीनाने पोस्ट केला फोटो
Just Now!
X