News Flash

“दिल बेचारावर टीका करु नका, अन्यथा…”; चेतन भगत यांनी टीकाकारांना दिला इशारा

सुशांतच्या शेवटच्या चित्रपटावरुन समिक्षकांमध्ये वाद-विवाद

अभिनेता सुशांत सिंह राजपुतचा शेवटचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या आगामी चित्रपटाचं नाव ‘दिल बेचारा’ असं आहे. हा चित्रपट ‘द फॉल्ट इन आर स्टार्स’ या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक असल्याचं म्हटलं जात आहे. यावरुन काही समिक्षकांनी चित्रपटावर टीका देखील केली होती. या टीकाकारांवर लेखक चेतन भगत यांनी उपरोधिक टोला लगावला आहे. समिक्षणात अतिआत्मविश्वास दाखवू नका, असं त्यांनी म्हटलं आहे.

अवश्य पाहा – १६व्या वर्षी ‘हा’ अभिनेता करणार होता आत्महत्या; कारण ऐकून व्हाल थक्क…

अवश्य पाहा – स्वत:च्या नावाचं फेक अकाउंट पाहून विद्युतला बसला झटका; म्हणाला…

“सुशांत सिंह राजपुतचा शेवटचा चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित होणार आहे. कृपया या चित्रपटाचं तटस्थपणे समिक्षण करावं. उगाचच अतिआत्मविश्वास दाखवून चित्रपटावर टीका करु नये. आधिच तुम्ही अनेक आयुष्य उद्ध्वस्त केली आहेत. आता तरी थांबा, आमचं तुमच्यावर लक्ष आहे.” अशा आशयाचं ट्विट करुन चेतन भगत यांनी टीकाकारांवर निशाणा साधला आहे. त्यांच हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

सुशांतने नैराश्यामुळे आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे. मात्र अद्याप त्याबद्दल अधिकृत माहिती मिळालेली नाही. पोलीस त्याच्या मृत्यूची चौकशी करत आहेत. या प्रकरणात आतापर्यंत ३५ जणांची चौकशी करण्यात आली आहे. ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत. २००९ मध्ये ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तो घरघरांत पोहोचला. त्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2020 12:17 pm

Web Title: chetan bhagat advice to critcs over dil bechara mppg 94
Next Stories
1 हात जोडून बिग बींनी मानले चाहत्यांचे आभार; म्हणाले…
2 दीपिकाने चाहत्याकडे मागितलं मोबाईलचं कव्हर; व्हिडीओ होतोय व्हायरल…
3 सुशांत आत्महत्या प्रकरण : पत्रकार राजीव मसंदची होणार पोलीस चौकशी
Just Now!
X