News Flash

सुपरहिरो ‘थॉर’ होणार हल्क होगन; WWE रिंगमध्ये करतोय सराव

ख्रिस हेम्सवर्थ झळकणार हल्क होगनच्या बायोपिकमध्ये

‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ या भव्यदिव्य सुपरहिरोपटात धमाका करणारा ‘थॉर’ उर्फ अभिनेता ख्रिस हेम्सवर्थ आता WWE रिंगमध्ये धुमाकूळ घालणार आहे. होय, आजवर सुपरहिरो ‘थॉर’ बनून शत्रूंच्या अंगावर विज पाडणारा ख्रिस आता एक WWE सुपरस्टार होण्याची तयारी करत आहे. येत्या काळात तो WWE सुपरस्टार ‘हल्क होगन’ यांची भूमिका साकारणार आहे.

टोटल फिल्म या मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत ख्रिसने हा चकित करणारा खुलासा केला. आगामी चित्रपटात तो WWE सुपरस्टार हल्क होगन यांची भूमिका साकारणार आहे. हा त्यांच्या आयुष्यावर तयार होणारा एक बायोपिकपट आहे. ही भूमिका साकारण्यासाठी तो प्रचंड उत्सुक आहे. तसेच हल्क होगन यांची विशेष फायटिंग शैली शिकण्यासाठी सध्या तो WWEच्या रिंगमध्ये घाम गाळत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे ‘जोकर’ चित्रपटाचे दिग्दर्शक टोड फिलिप्स या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. ख्रिसला या नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

‘हल्क होगन’ एक रेसलर होते. शिवाय त्यांनी काही चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. ७०-८०च्या दशकात त्यांनी आपल्या जबरदस्त फायटिंगच्या जोरावर WWEमध्ये धुमाकूळ घातला होता. अंडरटेकर आणि रॉक सारख्या अनेक नामांकित फायटर्सला त्यांनी धुळ चारली आहे. त्यांचं आयुष्य रुपेरी पडद्यावर अभिनेता ख्रिस हेम्सवर्थ साकारणार आहे. या घोषणेमुळे हल्क होगनचे चाहते देखील उत्सुक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2020 5:48 pm

Web Title: chris hemsworth on wwe superstar hulk hogan biopic mppg 94
Next Stories
1 कतरिनाच्या बहिणीला पाहिलेत का? फोटो होतोय व्हायरल
2 आलियाच्या आयुष्यात आली सेल्फी क्वीन मैत्रीण; फोटो होतोय व्हायरल…
3 झी टीव्हीवरील मालिकांचे नवे एपिसोड होणार प्रदर्शित
Just Now!
X