News Flash

‘साहो’मध्ये चंकी पांडे साकारणार खलनायक; लूक व्हायरल

हा चित्रपट ३० ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि प्रभासचा बहुचर्चित चित्रपट ‘साहो’ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटातील ‘आयो मेरा सैय्या सायको’ गाणे हे काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाले होते. आता या चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. हे पोस्टर पाहता चित्रपटात चंकी पांडे कोणत्या भूमिकेत दिसणार हे स्पष्ट झाले आहे.

चंकी पांडेने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे पोस्टर पोस्ट केले आहे. या पोस्टवरुन चंकी चित्रपटात खलनाकाच्या भूमिकेत दिसणार असून या पात्राते नाव ‘देवराज’ असे असणार आहे. या पोस्टरमध्ये चंकी पांडेने चॉकलेटी रंगाचा सूट परिधान केला असून बॅकग्राऊंटमध्ये आग लागल्याचे पाहायला मिळत आहे. यावरुन एकंदरीत चंकी चित्रपटात धमाका करणार असल्याचे म्हटले जात आहे.

कॉमेडी चित्रपट ‘हाऊसफूल २’मध्ये ‘आखिरी पास्ता’ची लोकप्रिय भूमिका साकारल्यानंतर चंकी आता ‘साहो’ चित्रपटात गंभीर भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात प्रभास, श्रद्धा आणि चंकी व्यतिरिक्त नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट ३० ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट तेलगू, तामिळ आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शित सुजीत करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2019 5:47 pm

Web Title: chunky pandey look from saaho movie is viral avb 95
Next Stories
1 ‘बाहुबली’मधल्या अभिनेत्याच्या पत्नीची आत्महत्या
2 किंग खानचं घर सजवण्यासाठी गौरी खानने घेतली ही मेहनत, पाहा फोटो
3 काश्मीरवर आतिफ असलमचं वादग्रस्त वक्तव्य, भारतीयांचा संताप
Just Now!
X